लक्ष्मीनगरला माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 00:59 IST2021-04-29T23:19:01+5:302021-04-30T00:59:47+5:30
मांडवड : शासनाने तालुक्यातील प्रत्येक गावात ह्यमाझे कुटुंब माझी जबाबदारीह्ण या योजनेतून गावातील प्रत्येक कुटुंबाच्या सर्वेक्षणास लक्ष्मीनगर, मांडवडला येथे सुरुवात करण्यात आली.

लक्ष्मीनगर येथे सर्वेक्षण करताना नारायण उगले, शेडगे, इंगळे व सोनवणे.
मांडवड : शासनाने तालुक्यातील प्रत्येक गावात ह्यमाझे कुटुंब माझी जबाबदारीह्ण या योजनेतून गावातील प्रत्येक कुटुंबाच्या सर्वेक्षणास लक्ष्मीनगर, मांडवडला येथे सुरुवात करण्यात आली.
या सर्वेक्षण पथकात तालुका स्तरावरून गावातील प्राथमिक शिक्षण नारायण उगले, शेंडगे, इंगळे व आशा स्वयंसेविका दुर्गा सोनवणे यांची निवड करण्यात आली. ही पथके गावातील व मळ्यातील प्रत्येक घरातील व प्रत्येक सदस्य याची चाचणी घेणार आहेत. यासाठी या पथकाकडे ऑक्सी पल्समीटर व थर्मल गन देण्यात आली आहे. यातून प्रत्येक व्यक्तीचे तापमान व ऑक्सिजनची पातळी समजणार आहे, हे सर्वेक्षण करताना जर बाधित व्यक्ती आढळली तर त्या व्यक्तीचे विलगीकरण करून उपचार करण्यात येणार आहे.