मविप्र निवडणुक मतमोजणी सुरु,निलीमा पवार आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 18:29 IST2017-08-14T18:26:40+5:302017-08-14T18:29:17+5:30

मविप्र निवडणुक मतमोजणी सुरु,निलीमा पवार आघाडीवर
लोकमत न्यूज नेटवक
नाशिक- जिल्ह्याचे लक्ष लागुन राहिलेल्या मराठा विद्या प्रसारक समाजाच्या रविवारी(दि.१३) झालेल्या निवडणुकीचे निकाल येण्यास प्रारंभ झाला आहे. मतमोजणी सुरु झाली असून सेवक संचालक गटात नानासाहेब दाते यांनी विद्यमान संचालक डॉ. अशोक पिंगळे यांना पराभूत केले.
पहिल्या फेरीत निलीमा पवार यांना ५०३ तर नितीन ठाकरे यांना ४७६ मते मिळाली. पवार २७ मतांनी पुढे आहे.
तिसºया फेरीत निलीमा पवार यांना ४९८ तर नितीन ठाकरे यांना ४९७ मते मिळाली.