मविप्र कुटुंबाचा घटक म्हणून सेवा करणार : हेमंत गोडसे

By Admin | Updated: May 30, 2014 01:05 IST2014-05-30T00:12:05+5:302014-05-30T01:05:13+5:30

देवळाली कॅम्प : समाजधुरिणांनी १९१४ मध्ये लावलेल्या मविप्र शिक्षण संस्थेच्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. संस्थेच्या कुटुंबाचा घटक म्हणून आपण कायम मदतीला पुढे राहणार असल्याचे प्रतिपादन खासदार हेमंत गोडसे यांनी केले.

MVP will serve as family component: Hemant Godse | मविप्र कुटुंबाचा घटक म्हणून सेवा करणार : हेमंत गोडसे

मविप्र कुटुंबाचा घटक म्हणून सेवा करणार : हेमंत गोडसे

देवळाली कॅम्प : समाजधुरिणांनी १९१४ मध्ये लावलेल्या मविप्र शिक्षण संस्थेच्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. संस्थेच्या कुटुंबाचा घटक म्हणून आपण कायम मदतीला पुढे राहणार असल्याचे प्रतिपादन खासदार हेमंत गोडसे यांनी केले.
देवळाली कॅम्प येथील मविप्रच्या एसव्हीकेटी महाविद्यालयात स्थानिक व्यवस्थापन समितीच्या बैठकीत खासदार गोडसे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना खासदार गोडसे यांनी, राज्यात मविप्र शिक्षण संस्थेचा शैक्षणिक क्षेत्रातील दबदबा अतिशय मोठा असून, शतक महोत्सव साजरा करणार्‍या संस्थेला अनेक समाजधुरिणांनी वेळोवेळी दिलेले नेतृत्व व मार्गदर्शन महत्त्वाचे आहे. संस्थेचे शासनस्तरावर जे काही काम असेल त्यासाठी आपण सदैव पुढे राहणार असल्याचे सांगून खासदार निधीतून वेळोवेळी मदतदेखील करणार असल्याचे सांगितले. सरचिटणीस नीलिमा पवार यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा सादर करताना येणार्‍या अडचणींचा ऊहापोह करीत सर्वांच्या सहकार्यातून त्या सोडविल्या जात आहेत. दिल्ली येथे वेळोवेळी शैक्षणिक कामाकरिता जावे लागते. त्यासाठी खासदार गोडसे यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. सभेस संस्थापक संचालक मुरलीधर पाटील, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माजी खासदार राजाभाऊ गोडसे, कॉम्रेड नामदेव गोडसे, ॲड. एन. जी. गायकवाड, ॲड. प्रकाश गायकर, डॉ. अशोक पाटील मोगल, दिनकर पाळदे, सुधाकर गोडसे, सुरेश कदम, संजय गोडसे, सुभाष खालकर, सुभाष चौधरी, प्रा. सुनीता आडके, प्रा. सुहास फरांदे, शिवाजी हांडोरे, गणपत कोठुळे, चंद्रभान संधान, कचरू मते आदि उपस्थित होते.
प्रास्ताविकात प्राचार्य बाबाजी अहेर म्हणाले, खासदार गोडसे यांनी आपल्या निधीतून अद्ययावत विशेष वर्गासाठी मदत करण्याचे आवाहन करत इमारतीच्या चटई क्षेत्राबाबतचा प्रश्न सोडविणे गरजेचे असल्याचे सांगितले. प्रा. सुहास फरांदे यांनी आभार मानले. (वार्ताहर)

Web Title: MVP will serve as family component: Hemant Godse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.