पंचायत समिती सदस्यावर हल्ल्याच्या निषेधार्थ मूक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 15:50 IST2018-08-29T15:50:31+5:302018-08-29T15:50:45+5:30

निवेदन : हल्लेखोरांवर कारवाईची मागणी

The mute front of the panchayat committee member protested against the attack | पंचायत समिती सदस्यावर हल्ल्याच्या निषेधार्थ मूक मोर्चा

पंचायत समिती सदस्यावर हल्ल्याच्या निषेधार्थ मूक मोर्चा

ठळक मुद्देटाकळी ग्रामस्थांच्या वतीने टाकळी ते लासलगाव पोलीस स्टेशन येथे मूक मोर्चा

लासलगांव : निफाड पंचायत समितीचे खडकमाळेगाव गणाचे शिवसेना सदस्य व लासलगावचे शिवसेना विभाग प्रमुख शिवा सुराशे यांच्या वर रविवारी (दि.२६) रात्री झालेल्या प्राणघातक हल्याच्या निषेधार्थ बुधवारी (दि.२९) टाकळी ग्रामस्थांच्या वतीने टाकळी ते लासलगाव पोलीस स्टेशन येथे मूक मोर्चा काढण्यात आला. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवकुमार पांढरे यांना यावेळी देण्यात आले.
या प्रसंगी लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर आणि तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बळीराम जाधव यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करतांना सांगितले, की लोकप्रतिनिधींवर अशा प्रकारचे हल्ले होणे हे निषेधार्थ व निंदनीय आहे.पोलीस प्रशासनान ेत्वरित हल्लेखोरांना अटक करून कडक कारवाई करावी अन्यथा संपूर्ण निफाड तालुक्यात आंदोलन तीव्र करण्यात येईल. असा इशारा देतानाच सदर घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी टाकळीचे सरपंच सोमनाथ गांगुर्डे, रामनाथ सुरासे, पोलीस पाटील विलास काळे, ग्रामपंचायत सदस्य राजू आहिरे,नवनाथ वैराळ,अरु ण राजोळे,शंकर शिंदे,शरद काळे,हरीश गवळी,माधव शिंदे यांचेसह टाकळीचे ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: The mute front of the panchayat committee member protested against the attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.