मुस्लीम आरक्षण संघर्ष आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 00:39 IST2019-12-17T00:38:54+5:302019-12-17T00:39:17+5:30
संविधानाच्या मूळ हेतूला हरताळ फासणाऱ्या एनसीआर आणि सीएबी यांसारख्या कायद्याला मागे घेण्यात यावे, अशी मागणी करीत मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने इदगाह मैदानावर आंदोलन आणि निदर्शने करण्यात आली.

मुस्लीम आरक्षण संघर्ष आंदोलन
नाशिक : संविधानाच्या मूळ हेतूला हरताळ फासणाऱ्या एनसीआर आणि सीएबी यांसारख्या कायद्याला मागे घेण्यात यावे, अशी मागणी करीत मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने इदगाह मैदानावर आंदोलन आणि निदर्शने करण्यात आली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन राष्टÑपतींकडे ही मागणी करण्याची विनंती करण्यात आली.
संविधानाच्या प्रास्ताविकामध्ये धर्मनिरपेक्ष आणि सर्वधर्मसमभाव मानणारी राज्यघटना असा उल्लेख असताना केंद्र शासनाने पारीत करून घेतलेला एनआरसी आणि कॅब हा कायदा केला असून, त्यामुळे जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण होऊन देशात अराजकता माजेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे हा कायदा मागे घेण्याची विनंती राष्टÑपतींकडे करण्यात आली आहे. या आंदोलनप्रसंगी अजीज पठाण, आसिफ खान, राजू देसले, कादर खान, मुख्तार सय्यद, बशीर सय्यद, शेरु मोमीन, सिकंदर अन्सारी आदी उपस्थित होते.