मुस्लीम समाजबांधवांनी काढली निषेध फेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 23:57 IST2019-02-23T22:47:17+5:302019-02-23T23:57:14+5:30

शहरातील काजीपुरा भागातील मुस्लीम समाजबांधवांनी शहरातून निषेध फेरी काढत पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी केली. 

 Muslim community protesters protest protest | मुस्लीम समाजबांधवांनी काढली निषेध फेरी

मुस्लीम समाजबांधवांनी काढली निषेध फेरी

सिन्नर : शहरातील काजीपुरा भागातील मुस्लीम समाजबांधवांनी शहरातून निषेध फेरी काढत पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी केली.  काश्मीर खोऱ्यातील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या तुकडीवर पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून हल्ला झाला होता. यात ४४ जवान शहीद झाले. या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी या फेरीचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी जुमआची नमाज अदा केल्यानंतर खतीब-ए-शहर मुजाहिद खतीब यांच्या नेतृत्वाखाली काजीपुरा भागातून मोर्चाच्या स्वरूपात मुस्लीम समाजबांधव एकत्र आले.
यावेळी शहर-ए-काजी जबीर खतीब, हाजी शमूभाई, अहमद हकिम कासम शेख, हाजी नसीर मणियार, हाजी अ. रज्जाक सय्यद, हाजी मुबारक, हाजी सलिम शेख, हाजी इक्बाल, इनुस पटेल, हाजी जमाल, मुजाहिद पटेल, जमीर काजी, साजीद खतीब आदी उपस्थित होते.  काजीपुरा भागातून शिवाजी चौकापर्यंत फेरी काढून पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत फेरी शिवाजी चौकात आल्यानंतर हल्ल्याचा निषेध करण्यात  आला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Web Title:  Muslim community protesters protest protest