कुत्र्यांच्या हल्ल्यात वानराची मादी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 00:30 IST2018-07-14T00:29:49+5:302018-07-14T00:30:08+5:30

खामखेडा : पिंपळदर ते खामखेडा येथील मांगबारी घाटात कुत्र्यांच्या हल्ल्यात वानराची मादी ठार झाल्याची घटना घडली.

Murray killed in dog attack | कुत्र्यांच्या हल्ल्यात वानराची मादी ठार

कुत्र्यांच्या हल्ल्यात वानराची मादी ठार

खामखेडा : पिंपळदर ते खामखेडा येथील मांगबारी घाटात कुत्र्यांच्या हल्ल्यात वानराची मादी ठार झाल्याची घटना घडली. साक्री-वणी-नाशिक हा राज्य महामार्ग क्रमांक १७ असून, या रस्त्यावर पिंपळदर ते खामखेडा या गावादरम्यान मांगबारी घाट आहे. या घाटाच्या डोंगरात मोठ्या प्रमाणात वानरांचे वास्तव्य आहे. या घाटात अनेकवेळा पोल्ट्रीवाले मृत कोंबड्या फेकतात. या कोंबड्या खाण्यासाठी कुत्रे मोठ्या प्रमाणात येतात. अशाच भटक्या कुत्र्यांनी शुक्रवारी ५ वाजेच्या दरम्यान वानराच्या कळपावर हल्ला केला. या हल्ल्यात पाच ते सहा म्ािहन्यांची वानराची मादी ठार झाली.

Web Title: Murray killed in dog attack