वांजुळपाडा येथील युवकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 01:10 IST2021-03-01T19:16:29+5:302021-03-02T01:10:55+5:30

सुरगाणा : घाटमाथ्यावरील हरणटेकडी शिवारातील रोटी फाट्याजवळ युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली असून यापाठीमागे घातपात असल्याची चर्चा होत आहे. पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

Murder of a youth at Wanjulpada | वांजुळपाडा येथील युवकाची हत्या

वांजुळपाडा येथील युवकाची हत्या

ठळक मुद्देयाप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

सुरगाणा : घाटमाथ्यावरील हरणटेकडी शिवारातील रोटी फाट्याजवळ युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली असून यापाठीमागे घातपात असल्याची चर्चा होत आहे. पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील वाजुंळपाडा येथील ३० वर्षीय युवक राजेंद्र ढवळू बागुल असे मयताचे नाव असून त्याचा मृतदेह हरणटेकडी शिवारातील रोटी फाटाजवळ रस्त्यालगत चारीमध्ये सोमवारी (दि.१) सकाळी आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक नीलेश बोडखे, हवालदार प्रभाकर सहारे, चंद्रकांत दवंगे, पराग गोतरणे, तानाजी झुरडे, संतोष गवळी घटनास्थळी दाखल झाले. अज्ञात व्यक्तीने राजेंद्रच्या डोक्यावर दगड मारून हत्या केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड, पोलीस निरीक्षक दिवाणसिंग वसावे यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता सुरगाण्यातील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.
याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिवाणसिंग वसावे करीत आहेत.
- ०१ राजेंद्र बागुल.

Web Title: Murder of a youth at Wanjulpada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.