लोणारवाडी येथे महिलेचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:18 IST2021-08-12T04:18:04+5:302021-08-12T04:18:04+5:30

हिराबाई मारुती पवार (५२) असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांचे भाऊ संतू मारुती पवार, रा. तांबेश्वरनगर, गावठा (सिन्नर) ...

Murder of a woman at Lonarwadi | लोणारवाडी येथे महिलेचा खून

लोणारवाडी येथे महिलेचा खून

हिराबाई मारुती पवार (५२) असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांचे भाऊ संतू मारुती पवार, रा. तांबेश्वरनगर, गावठा (सिन्नर) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. लोणारवाडी येथे रस्त्यालगत असलेल्या घरात हिराबाई पवार एकट्याच राहत होत्या. ६ ऑगस्टच्या सायंकाळी चार ते ८ ऑगस्टच्या दुपारी ३ वाजेदरम्यान अज्ञात व्यक्तीने हिराबाई यांच्या डोक्यात हत्याराने मारले. घाव वर्मी लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. दोन-तीन दिवसांपासून नातेवाईक हिराबाई यांच्या मोबाइलवर संपर्क साधत होते. मात्र मोबाइल उचलला जात नव्हता. नातेवाईक घरी आले असता घराला बाहेरून कुलूप असल्याने पुन्हा मोबाइलवर कॉल केला असता घरातून रिंगचा आवाज आला. त्यानंतर या घटनेचा उलगडा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

---------------------------

श्वानपथकाला पाचारण

घटनेनंतर पाेलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. आरंभी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तथापि, संतू पवार यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.

Web Title: Murder of a woman at Lonarwadi