उसनवार घेतलेल्या सातशे रुपयांसाठी मित्राचा केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 01:48 IST2020-07-29T22:58:50+5:302020-07-30T01:48:08+5:30

नाशिक : उसनवार घेतलेले सातशे रुपये परत देण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून मित्राच्या डोक्यात दगड टाकून त्याच्याजवळील १८ हजार रुपयांची रोकड घेत फरार झालेल्या संशयित संदीप मनोहर सोनवणे (२६, रा. अशोकनगर, सातपूर) यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अखेर बेड्या ठोकल्या.

Murder of a friend for seven hundred rupees borrowed | उसनवार घेतलेल्या सातशे रुपयांसाठी मित्राचा केला खून

उसनवार घेतलेल्या सातशे रुपयांसाठी मित्राचा केला खून

ठळक मुद्देउलगडा : मोहदरी घाटात आठवडाभरापूर्वी आढळला होता मृतदेह

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : उसनवार घेतलेले सातशे रुपये परत देण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून मित्राच्या डोक्यात दगड टाकून त्याच्याजवळील १८ हजार रुपयांची रोकड घेत फरार झालेल्या संशयित संदीप मनोहर सोनवणे (२६, रा. अशोकनगर, सातपूर) यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अखेर बेड्या ठोकल्या.
मोहदरी घाटात २० जुलै रोजी एका युवकाचा मृतदेह आढळला होता. सातपूर परिसरात राहणारे संदीप व अशोक महाजन हे दोघे मित्र सिन्नर औद्योगिक वसाहतीतून दुचाकीवरून नाशिककडे येत होते. यावेळी संदीपने अशोककडे उसनवार घेतलेले सातशे रुपये मागितले. मात्र अशोकने ते देण्यास नकार दिला. यावेळी संदीपने त्यास ‘अठरा हजार रुपये तुझ्याकडे आहे, मग सातशे रुपये का देत नाही’ असा प्रतिप्रश्न केला असता त्याने नंतर देतो असे सांगितले; मात्र त्याचा राग मनात धरून मोहदरी घाटातील वनोद्यानाजवळ दुचाकी थांबवून संदीपने अशोकच्या डोक्यात दगड टाकून त्यास ठार मारल्याचे तपासात निष्पन्न झाले असे पोलिसांनी सांगितले. मोहदरी घाट परिसरातील वनोद्यानाजवळ २० जुलैला एक मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी सिन्नरला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर तो मृतदेह अशोक बारकू महाजन (३८, रा. सातपूर) यांचा असल्याचे स्पष्ट झाले. स्थानिक गुन्हे शाखेने तपासाला सुरुवात केली असता महाजन व संदीप सोनवणे हे दोघे सिन्नरला सोबत काम करीत असल्याचे समोर आल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने अशोक महाजन याचा खून केल्याची कबुली दिली, असे पोलिसांनी सांगितले. १८ हजारांची रोकड घेऊन फरारमित्राच्या डोक्यात दगड टाकून त्याला ठार मारल्यानंतर संदीप हा अशोकजवळील १८ हजारांची रोकड घेत दुचाकीने फरार झाला होता. तो सातपूर येथील अशोकनगर येथे येऊन वावरत होता. याबाबत पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून सहायक निरीक्षक अनिल वाघ, सहायक उपनिरीक्षक प्रभाकर पवार, हवालदार प्रकाश चव्हाणके आदींनी अशोकनगरमधून त्याच्या मुसक्या आवळल्या.

Web Title: Murder of a friend for seven hundred rupees borrowed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.