अंगणगावी परप्रांतीय मजुराचा खून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 01:43 AM2021-03-25T01:43:35+5:302021-03-25T01:44:30+5:30

येवला शहरालगत असलेल्या अंगणगाव औद्योगिक सहकारी वसाहतीत परप्रांतीय मजुराचा खून झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Murder of Angangavi foreign laborer | अंगणगावी परप्रांतीय मजुराचा खून 

अंगणगावी परप्रांतीय मजुराचा खून 

Next

येवला : शहरालगत असलेल्या अंगणगाव औद्योगिक सहकारी वसाहतीत परप्रांतीय मजुराचा खून झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
 अंगणगाव औद्योगिक सहकारी वसाहतीत सिमेंट टाईल्स बनविणार्‍या कारखान्यात बाबूलाल काशी रावत (४०, रा. फिरोजपुर रुईखेडा, ता. सफिपुर जिल्हा उनाव, उत्तर प्रदेश) मजूर म्हणून काम करत होता. बाबुलाल दारू पिऊन राहुल कुमार रावत त्रास द्यायचा. यावरून राहुल याने रविवारी, (दि. २१) रात्री बाबुलाल याचे डोके भिंतीवर आपटले. यात बाबूलाल याचा मृत्यू झाला. पोलिसांनी चौकशीची सुत्रे वेगाने फिरवली. अवघ्या पाच तासाच्या तपासात बाबूलाल यांचा राहुल याने खुन केल्याचा संशय दाट झाल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले.

Web Title: Murder of Angangavi foreign laborer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.