पालिका कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

By Admin | Updated: January 3, 2017 00:46 IST2017-01-03T00:46:04+5:302017-01-03T00:46:29+5:30

येवला : मागण्या पूर्ण करण्याचे प्रशासनाकडून आश्वासन

Municipal workers' movement | पालिका कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

पालिका कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

येवला : वारंवार मागण्या व आंदोलने करूनदेखील पालिका कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीच्या रकमा खात्यावर जमा नाहीत यासह सात न्याय्य मागण्यांबाबत पालिका दुर्लक्ष करत आहे. या निषेधार्थ भारतीय मजदूर संघाच्या वतीने नववर्षाच्या कामाच्या पहिल्या दिवशीच धरणे आंदोलन करण्यात आले. पालिका कर्मचाऱ्यांनी सोमवारी (दि. २) सुमारे दोन तास ठिय्या आंदोलन केले. आंदोलनाचे नेतृत्व भारतीय मजदूर संघाचे प्रदेश संघटक शशिकांत मोरे व संघटनेचे विभागीय सचिव प्रशांत पाटील यांनी केले. याबाबतचे निवेदन नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांना देण्यात आले. दरम्यान, मुख्याधिकारी राहुल वाघ व नगरसेवक दयानंद जावळे, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांनी आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. या निवेदनावर चर्चा होऊन कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण
करण्याचे आश्वासन नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर व मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिले. (वार्ताहर)






 

Web Title: Municipal workers' movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.