शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

मनपा शाळेचे विद्यार्थी लेझीमने करणार पंतप्रधानांचे स्वागत; खासगी शाळांतील चारशे विद्यार्थी सज्ज

By suyog.joshi | Updated: January 10, 2024 15:04 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी महापालिका, तसेच खासगी शाळांतील चारशे विद्यार्थी सज्ज झाले आहेत.

नाशिक (सुयोग जोशी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी महापालिका, तसेच खासगी शाळांतील चारशे विद्यार्थी सज्ज झाले आहेत. मुलांसाठी केशरी व पांढऱ्या रंगाचा ड्रेस कोड असेल. तर मुली महाराष्ट्राची पारंपरिक वेशभूषा असेलेली नववार साडी परिधान करणार आहे. मनपा शिक्षण विभागाकडून या स्वागत सोहळ्याची जोरदार रंगीत तालीम सुरू आहे.

स्वामी विवेकानंद यांची जंयती दरवर्षी युवा दिन म्हणून देशभरात उत्साहात साजरी केली जाते. त्या दिवशी विविध उपक्रमांतून युवा शक्तीच्या कलागुणांना वाव देऊन त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देणे हा मुख्य उद्देश असतो. यंदा २७ वा युवा महोत्सव आयोजनाचा मान हा नाशिकला मिळाला आहे. पंतप्रधान मोदी यांचा ताफा ज्या मार्गाने जाईल व रोड शो मार्गावर विद्यार्थी लेझीम व ढोल वाजवत त्यांचे कलागुण सादर करतील. त्यासाठी विद्यार्थ्यांची रोज रंगीत तालीम सुरू आहे. विद्यार्थी केशरी व पांढऱ्या रंगाचा ड्रेसकोड परिधान करतील. तर मुली नववारी नेसून मराठी परंपरेचे दर्शन घडवतील. या विद्यार्थ्यांना तपोवनपर्यंत ने -आण करण्यासाठी सिटीलिंक बसची व्यवस्था करण्यात आली आहे.आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्या मार्गदर्शनानुसार युवा दिनाची तयारी सुरू आहे. मनपा शाळेतील चारशे विद्यार्थी पंतप्रधान मोदी यांचे लेझीम व ढोल वाजवत स्वागत करतील. या सोहळ्याद्वारे त्यांच्या कलागुणांना वाव दिला जाईल.- बी. टी. पाटील, शिक्षणाधिकारी, मनपा