महापालिकेचे बिटको रुग्णालय होणार सुपरस्पेशालिटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:19 IST2021-06-16T04:19:47+5:302021-06-16T04:19:47+5:30
नाशिक लोकमतच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने संवाद कार्यक्रमात त्यांनी महापालिकेच्या विविध योजनांची माहिती दिली. बिटको रुग्णालय सज्ज करताना त्यात ...

महापालिकेचे बिटको रुग्णालय होणार सुपरस्पेशालिटी
नाशिक लोकमतच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने संवाद कार्यक्रमात त्यांनी महापालिकेच्या विविध योजनांची माहिती दिली. बिटको रुग्णालय सज्ज करताना त्यात पुरेसे तज्ज्ञ मिळावे त्यासाठी पदव्युत्तर शिक्षणक्रमांचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली. लोकमतचे कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी तसेच सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक यांनी त्यांचे स्वागत केले आणि शहर विकासावर संवाद साधला.
कोरोनाची दुसरी लाट अत्यंत भयंकर होती. पहिल्या लाटेच्या चारपट अधिक रुग्ण नाशिक शहरात होते. महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन आणि नवीन बिटको रुग्णालयाची उपयुक्तता यानिमित्ताने लक्षात आली. खासगी रुग्णालयात देखील उत्तर महाराष्ट्रातून रुग्ण दाखल झाल्याने नाशिक हे मेडिकल हब असल्याचा प्रत्यय आला. भविष्यात तिसऱ्या लाटेचा किंवा अन्य आजारांचा सामना करण्यासाठी हे सुपर स्पेशालिटी करण्यात येणार आहे, असे सांगून आयुक्त म्हणाले की, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी पुरेसे तज्ज्ञ उपलब्ध व्हावेत यासाठी किमान पंधरा पदव्युत्तर पदवी वैद्यकीय शिक्षणक्रम सुरू करण्यात आहेत. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टर आणि त्यांना शिकवणारे आणखी डॉक्टर्स उपलब्ध होऊ शकतील. या रुग्णालयात अद्ययावत शस्त्रक्रिया कक्ष तसेच रक्तपेढी देखील सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांना सर्व प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या, निदान आणि उपचार सुविधा मिळू शकेल, असे आयुक्त म्हणाले.
इन्फेा...
सीटी लिंकमधून जागतिक दर्जाची बस सेवा
महापालिकेची बस सेवा सुरू करताना अन्य महापालिकांपेक्षा वेगळी जागतिक दर्जाची तांत्रिकदृष्ट्या प्रगत बस सेवा करण्यावर भर आहे. त्यामुळे ॲप आणि संगणकीकरण त्याचा आधार असणार आहे. एका ॲपमधून नागरिक बस सेवेची माहिती घेऊन या सेवेचा लाभ घेऊ शकतील. सीटी लिंक ही संकल्पना बसपुरतीच नाही तर मेट्रोसाठी देखील वापरली जाणार आहे.
इन्फो...
पुढील वर्षात सहा स्मार्ट स्कूल
महापालिकेच्या सहा शाळा पुढील वर्षी स्मार्ट स्कूल म्हणून तयार होतील. चकचकित काचेच्या शाळा करण्यापेक्षा शाळेतील शिक्षणाचा दर्जा वाढवून या शाळा तयार करण्यात येणार असून, त्यासाठी प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. अनेक काॅर्पोरेट कंपन्या त्यासाठी निधी देणार आहेत.