शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
3
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
6
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
7
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
8
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
9
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
10
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
11
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
12
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
13
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
14
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
15
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
16
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
17
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
18
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
19
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
20
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

पालिकेकडे ६९ तक्रारी, सूचना प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:34 IST

नागरिकांशी सुसंवाद साधत त्यांच्या तक्रारी व सूचना जाणून घेण्यासाठी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमाची सुरुवात शनिवारी (दि.२१) करण्याचे नियोजित केले होते. परंतु, ऐनवेळी त्यांच्या मातोश्रींची प्रकृती बिघडल्याने मुंढे यांनी अशा परिस्थितीतही उपक्रमस्थळी हजेरी लावत उपस्थित नागरिकांकडे दिलगिरी व्यक्त केली

नाशिक : नागरिकांशी सुसंवाद साधत त्यांच्या तक्रारी व सूचना जाणून घेण्यासाठी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमाची सुरुवात शनिवारी (दि.२१) करण्याचे नियोजित केले होते. परंतु, ऐनवेळी त्यांच्या मातोश्रींची प्रकृती बिघडल्याने मुंढे यांनी अशा परिस्थितीतही उपक्रमस्थळी हजेरी लावत उपस्थित नागरिकांकडे दिलगिरी व्यक्त केली आणि उपक्रम पुढच्याशनिवारपर्यंत रहित केला. दरम्यान, या उपक्रमांतर्गत ६९ तक्रारी व सूचना प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींचे निराकरण तातडीने करण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधित खातेप्रमुखांना दिले.  महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रशासकीय कामकाजात शिस्त लावतानाच काही धडाकेबाज निर्णय घेतले आहेत. याशिवाय, नागरिकांना त्यांच्या तक्रारी मांडण्यासाठी ‘एनएमसी ई-कनेक्ट’ नावाचे मोबाइल अ‍ॅपही उपलब्ध करून दिलेले आहे. सदर अ‍ॅपवर येणाऱ्या तक्रारींच्या निराकरणाची प्रक्रिया सुरू असतानाच मुंढे यांनी नवी मुंबई येथे त्यांच्या कारकिर्दीत राबविलेली ‘वॉक विथ कमिशनर’ ही संकल्पना नाशिक येथेही राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, शनिवारी (दि.२१) सकाळी ६.३० वाजता गोल्फ क्लबवरील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर त्यासंबंधीचे नियोजन करण्यात आले होते. मैदानावरील नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या कार्यालयाबाहेर एक छोटेखानी व्यासपीठ उभारण्यात आले होते.याशिवाय, समोर नागरिकांना तक्रारी मांडण्यासाठी टोकन देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यासाठी पाच ते सहा टेबल मांडण्यात आले होते. टोकन घेतलेल्या नागरिकाने आयुक्तांची भेट घेऊन त्यांना आपले निवेदन सादर करायचे आणि आयुक्तांनी तक्रारीचे स्वरूप पाहून संबंधित खातेप्रमुखाला आदेशित करायचे, असा हा उपक्रम होता. सकाळी ६ वाजेपासून टोकन देण्यास सुरुवात झाली. उपस्थित नागरिकांकडून आयुक्तांची प्रतीक्षा केली जात असतानाच ६.४५ वाजेच्या सुमारास आयुक्त तुकाराम मुंढे हे घाईघाईने उपक्रमस्थळी आले आणि त्यांनी ध्वनिक्षेपक हाती घेत आपल्या मातोश्रीची प्रकृती अचानक बिघडल्याने सदरचा कार्यक्रम पुढच्या शनिवारी घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले. नागरिकांच्या तक्रारी संकलित करून त्यांचे निराकरण करण्याचे आदेश संबंधित अधिकाºयांना देण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनीही शांतता ठेवली. तत्पूर्वी, पहाटे ५ वाजेपासूनच दोन्ही अतिरिक्त आयुक्त, उपायुक्तांसह सर्व खात्यांचे अधिकारी झाडून मैदानावर उपस्थित होते.जॉगिंग ट्रॅकवर स्वच्छताआयुक्त तुकाराम मुंढे यांचा ‘वॉक विथ कमिशनर’ हा उपक्रम कान्हेरे मैदानावर होणार असल्याने जॉगिंग ट्रॅकवर स्वच्छता दिसून आली. अशीच स्वच्छता कायमस्वरूपी राहावी, अशी भावना यावेळी जॉगिंगसाठी आलेल्या नागरिकांनी व्यक्त केली. याशिवाय, एका नागरिकाने जॉगिंग ट्रॅकवर पाणी मारण्यासंबंधीची सूचना थेट आयुक्तांकडे केली असता, त्यांनी सकाळ-संध्याकाळ त्याबाबतचे नियोजन करण्यात येत असल्याचे सांगितले.अतिक्रमण, पाणीपुरवठाविषयक तक्रारी‘वॉक विथ कमिशनर’ या पहिल्याच उपक्रमात ६९ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यात प्रामुख्याने, अतिक्रमण आणि पाणीपुरवठाविषयक तक्रारी अधिक होत्या. याशिवाय, गाळेधारक संघटनांकडूनही गाळेभाडे कमी करण्याविषयीचे निवेदन होते तर ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून आडगाव येथील ट्रक टर्मिनस येथे सुविधा पुरविण्याची मागणी करण्यात आलेली होती. जॉगर्स क्लबच्या वतीने गोल्फ क्लबवरील जॉगिंग ट्रॅकच्या बाबत सुविधांची मागणी होती. एका इसमाने प्रभाग समित्यांवर सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींना सदस्यत्व मिळावे, अशी सूचना केलेली होती. मोकळ्या भूखंडावरील वहिवाट, अस्वच्छतेचाही विषय होता. शासनाचे अनधिकृत बांधकामविषयक धोरण प्रभावीपणे राबविण्याची सूचना होती. काही भागात रस्ता डांबरीकरणाची मागणी होती.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका