शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

गणेशोत्सवाच्या नावाखाली महापालिकेचे चांगभलं !

By श्याम बागुल | Published: September 04, 2018 5:33 PM

यंदा गणेशोत्सव साजरा करण्यापूर्वीपासूनच महापालिका व पोलीस प्रशासनाने जाचक अटी, नियम व शर्ती टाकून गणेशभक्तांना जेरीस आणण्यास सुरुवात केली असून, महापालिकेच्या विविध परवानग्या व पोलिसांचा ना हरकत दाखला मिळेपर्यंत होणाºया यातना पाहता उत्सवच साजरा न केलेला बरा अशी भावना व्यक्त केली जात

ठळक मुद्देपैशांची आकारणी : दात कोरून पोट भरण्याचा प्रकारपरवानगीसाठी ७५० रुपये व एका स्वागत कमानीसाठी ७५० रुपये शुल्क आकारणी

नाशिक : देणगी, वर्गणी व प्रसंगी खिशातून दरवर्षी सार्वजनिक गणेश उत्सवासाठी पै न पै गोळा करणाऱ्या मंडळांपुढे यंदा महागाईचे सावट असतानाच ते कमी की काय म्हणून नाशिक महापालिकेनेदेखील गणेश मंडळांना विविध परवानग्या देण्याच्या नावाने पैसे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. मंडप उभारणी, रस्त्याचे खोदकामापासून ते गणेशोत्सव साजरा करण्यासाठी लागणाºया लेखी अनुमतीसाठीही मोठ्या प्रमाणावर कर आकारल्यामुळे कोट्यवधीचे अंदाजपत्रक तयार करणाºया महापालिकेचे धोरण म्हणजे ‘दात कोरून पोट भरण्याचा प्रकार’ असल्याचे मानले जात आहे.यंदा गणेशोत्सव साजरा करण्यापूर्वीपासूनच महापालिका व पोलीस प्रशासनाने जाचक अटी, नियम व शर्ती टाकून गणेशभक्तांना जेरीस आणण्यास सुरुवात केली असून, महापालिकेच्या विविध परवानग्या व पोलिसांचा ना हरकत दाखला मिळेपर्यंत होणाºया यातना पाहता उत्सवच साजरा न केलेला बरा अशी भावना व्यक्त केली जात आहे. एकीकडे उत्सवाची तयारी व दुसरीकडे परवानग्यांसाठी गणेशभक्तांना धावपळ करावी लागत असून, गणेशभक्तांच्या याच उत्साहाचा महापालिकेने आर्थिक लाभ उचलण्याचा पुरेपूर प्रयत्न चालविला आहे. मुळातच रस्त्यावर मंडप उभारण्यास अनुमती देतांना खळखळ करणा-या महापालिकेने मंडप उभारणीच्या परवानगीसाठी ७५० रुपये व एका स्वागत कमानीसाठी ७५० रुपये शुल्क आकारणी केली आहे. त्यातही स्वागत कमान असो वा मंडपाची उभारणी असो त्यासाठी गणेशभक्तांना रस्ता खोदण्यास मनाई करण्यात आली असून, वाळूच्या ड्रममध्ये लाकडी बांबू टाकूनच कमान उभारण्याची सक्ती करण्यात आली आहे. या कामासाठी जर रस्ता खोदल्यास तर त्यास नियमानुसार हजारो रुपयांचा दंड करण्याची तयारीही महापालिकेने चालविली आहे. गणेशोत्सवात व्यावसायिक प्रतिष्ठाने, वस्तू उत्पादित कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर जाहिराती केल्या जातात. विशेष करून गणेशोत्सव मंडळांच्या स्वागत कमानींवरच जाहिरातींचे फलक झळकतात, अशा जाहिरातबाजीलाही महापालिकेने आक्षेप घेतला असून, कमानीवर अथवा मंडपाच्या आवारात वाणिज्य जाहिरात करावयाची असल्यास त्यासाठी वेगळी अनुमती व विहित शुल्क भरण्याचा सल्ला गणेश मंडळांना देण्यात आला आहे.महापालिकेने गणेशोत्सवाला पैसे कमविण्याचे साधन ठरवून आकारणी करण्यात येणाºया प्रत्येक परवानगीसाठी शुल्क आकारण्याबरोबरच सदरच्या शुल्कावर वस्तू व सेवाकराची (जीएसटी) वेगळी आकारणी करण्याचे ठरविले आहे. गणेशोत्सवासाठी करण्यात येणाºया विद्युत रोषणाईसाठी महावितरणकडून वीजजोडणी घेण्यासाठी पैसे मोजण्याबरोबरच महापालिकेच्या अग्निशामक विभागाचे त्यासाठी लागणारे ना-हरकत प्रमाणपत्रासाठीदेखील वेगळे शुल्क आकारण्यात येणार आहे, त्यामुळे यंदा महापालिकेने गणरायांनाच कराच्या विळख्यात जखडल्याची भावना व्यक्त होऊ लागली आहे.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवNashikनाशिक