शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

महापालिका : सुधारित आकृतिबंधाकडे लक्ष अग्निशमन दलात अपुरे मनुष्यबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 01:34 IST

नाशिक : शहरात आगीची दुर्घटना, पूरपरिस्थिती अथवा कोणतीही आपत्कालीन स्थिती असो, महापालिकेच्या अग्निशमन विभागावर जबाबदारी येऊन पडते.

ठळक मुद्देशासनाकडून त्यास हिरवा कंदील मिळालेला नाहीदलाला नियोजन करतानाही अडचणीचे

नाशिक : शहरात आगीची दुर्घटना, पूरपरिस्थिती अथवा कोणतीही आपत्कालीन स्थिती असो, महापालिकेच्या अग्निशमन विभागावर जबाबदारी येऊन पडते. मात्र, याच अग्निशमन दलात सध्या अवघे दीडशे कर्मचारी कार्यरत असून, अपुऱ्या मनुष्यबळाची चिंता भेडसावत आहे. महापालिकेने सुधारित आकृतिबंध शासनाकडे मंजुरीसाठी पाठविलेला आहे. मात्र, अद्याप शासनाकडून त्यास हिरवा कंदील मिळालेला नाही.महापालिकेच्या अग्निशमन दलात सद्य:स्थितीत १५३ कर्मचारी कार्यरत आहेत. प्रत्यक्षात शहराचा वाढता विस्तार पाहता दलाला ५५० कर्मचाºयांची आवश्यकता आहे. दर वर्षी दलातून ५ ते १० कर्मचारी सेवानिवृत्त होत आहे. कर्मचाºयांची घटणारी संख्या आता अग्निशमन विभागाला भेडसावत आहे. बºयाचदा कर्मचाºयांच्या रजा लक्षात घेता दलाला नियोजन करतानाही अडचणीचे ठरते. दोन वर्षांपूर्वी झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याप्रसंगी अग्निशमन दलात कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरतीचा प्रश्न समोर आला होेता.परंतु, त्याला मान्यता मिळालेली नव्हती. त्यावेळी सुमारे ७५० कर्मचारी भरतींचा प्रस्ताव होता. अग्निशमन दलातून काही अनुभवी कर्मचारी निवृत्त होत असल्याने त्यांची जागा भरून काढणारे कर्मचारी उपलब्ध होणे अवघड होऊन बसले आहे. शहरात दरवर्षी आगीच्या घटनांचे असणारे प्रमाण तसेच पावसाळ्यात गोदावरी नदीला येणाºया पूरस्थितीचा सामना महापालिकेच्या अग्निशमन विभागाला करावा लागतो. याशिवाय, जिल्ह्यात कुठे आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास नाशिकच्या अग्निशमन दलाला पाचारण केले जाते.दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या अग्निशमन दलाने सायखेडा नांदूरमध्यमेश्वर येथे काही लोकांना पूरस्थितीतून वाचवले होते. त्याची दखल घेत महापालिकेच्या सात कर्मचाºयांना राष्टÑपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अपुºया मनुष्यबळावर महापालिकेचा अग्निशमन विभाग कार्यरत असून, महापालिकेने शासनाकडे पाठविलेल्या सुधारित आकृतिबंधाची आता प्रतीक्षा आहे.