शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

महापालिकेने खासगी एजन्सीमार्फत केलेल्या वॉटर आॅडिटचा अहवाल प्रशासनाला सादर सुमारे ४१ टक्के पाणीगळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 00:57 IST

महापालिकेने खासगी एजन्सीमार्फत केलेल्या वॉटर आॅडिटचा अहवाल प्रशासनाला सादर झाला असून, शहरात विविध कारणांतून सुमारे ४१ टक्के पाणीगळती होत असल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान, सदर अहवाल स्मार्ट सिटी कंपनीकडे सादर करण्यात आला आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत वॉटर आॅडिटच्या साहाय्याने पाणीपुरवठा विषयक व्यवस्थेत अनेक सुधारणा करण्यात येणार आहेत.

ठळक मुद्दे शहरात सुमारे ४१ टक्के पाणीगळती अहवाल स्मार्ट सिटी कंपनीकडे महापालिका प्रशासनाला वॉटर आॅडिटचा अहवाल

नाशिक : महापालिकेने खासगी एजन्सीमार्फत केलेल्या वॉटर आॅडिटचा अहवाल प्रशासनाला सादर झाला असून, शहरात विविध कारणांतून सुमारे ४१ टक्के पाणीगळती होत असल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान, सदर अहवाल स्मार्ट सिटी कंपनीकडे सादर करण्यात आला आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत वॉटर आॅडिटच्या साहाय्याने पाणीपुरवठा विषयक व्यवस्थेत अनेक सुधारणा करण्यात येणार आहेत. महापालिकेने पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेचे परीक्षण करण्यासाठी खासगी एजन्सीला काम देण्यात आले होते. त्यानुसार, दीड वर्षांपासून वॉटर आॅडिटचे काम सुरू होते. अखेर, संबंधित एजन्सीने महापालिका प्रशासनाला वॉटर आॅडिटचा अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार, शहरात सुमारे ४१ टक्के पाणीगळती होत असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाणके यांनी दिली. त्यात, प्रामुख्याने, पाइपलाइनसह जलशुद्धीकरण केंद्रे, जलकुंभ या ठिकाणी सुमारे १८ टक्क्यांच्या आसपास गळती असून, उर्वरित गळती ही विनामहसुली आहे. वॉटर आॅडिटच्या अहवालाचा आता अभ्यास करून त्यादृष्टीने अंमलबजावणीवर भर दिला जाणार आहे. सदर अहवाल स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या कंपनीला पाठविण्यात आला आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत गावठाण भागातील पाइपलाइन बदलणे, चोवीस तास पाणीपुरवठ्याची व्यवस्था करणे, स्मार्ट मीटर बसविणे आदी विविध कामे करण्याचे प्रस्तावित आहेत.  नवीन वर्षात वॉटर आॅडिटच्या अहवालानुसार प्रत्यक्ष कामांना सुरुवात केली जाणार असल्याचेही चव्हाणके यांनी सांगितले. दरम्यान, वॉटर आॅडिटबरोबरच एनर्जी आॅडिटही करण्यात येत असून, त्याचा अहवालही या महिन्याच्या अखेरीस सादर होण्याची शक्यता आहे. प्रशासनापुढे आव्हान नाशिक शहराला गंगापूर व दारणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. सर्वसाधारणपणे गंगापूर धरणातून प्रतिदिन ४३० दशलक्ष लिटर्स पाण्याची उचल केली जात आहे. शहरात आजमितीला १०९ जलकुंभ असून, चार जलशुद्धीकरण केंद्रामार्फत पाण्याची वितरण व्यवस्था चालविली जाते. मात्र, पाणीपुरवठा वितरणात सुमारे ४० टक्के गळती होत असल्याचा आरोप महासभांमध्ये लोकप्रतिनिधी वारंवार करत आले आहेत. जेव्हा जेव्हा पाणीपट्टीचे दर वाढविण्याचे प्रस्ताव महासभेपुढे चर्चेला येतात त्यावेळी पाणीगळती रोखण्याची मागणी प्रशासनाकडे केली जाते. आता वॉटर आॅडिटनुसार पाणीगळती रोखण्याचे आव्हान प्रशासनापुढे असणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणी