महापालिकेकडे थकले पाणीपट्टीचे ५८ कोटी

By Admin | Updated: May 7, 2017 00:32 IST2017-05-07T00:31:32+5:302017-05-07T00:32:44+5:30

नाशिक : गंगापूर धरणातून उचललेल्या पाण्याच्या मोबदल्यात थकलेल्या ५८ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी पाटबंधारे खाते पाणी खंडित करण्याची शक्यता आहे.

Municipal corporation has got tired watercr price of 58 crores | महापालिकेकडे थकले पाणीपट्टीचे ५८ कोटी

महापालिकेकडे थकले पाणीपट्टीचे ५८ कोटी

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : नाशिक शहरवासीयांसाठी गंगापूर धरणातून महापालिका पाण्याची उचल करीत असली तरी, उचललेल्या पाण्याच्या मोबदल्यात होणारी पाणीपट्टी पाटबंधारे खात्याकडे भरण्यास गेल्या तीन ते चार महिन्यांपासून चालढकल करीत असल्यामुळे थकलेल्या ५८ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी पाटबंधारे खाते नाशिक महापालिकेचे पाणी खंडित करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विशेष करून महापालिका क्षेत्रात सुमारे ३० टक्के पाण्याचा वापर व्यावसायिक कारणांसाठी होत असताना महापालिका मात्र पाटबंधारे खात्याला घरगुती वापरासाठी आकारण्यात येणाऱ्या पाण्याचे देयक अदा करीत असून, नेमका त्यालाच पाटबंधारे खात्याने आक्षेप घेतला आहे. पाटबंधारे खात्याने महापालिका वेळोवेळी पत्रव्यवहार करून महापालिका हद्दीसाठी गंगापूर धरणातून उचलल्या जाणाऱ्या एकूण पाण्याच्या पाच टक्के पाणी हे व्यावसायिक कारणासाठी वापरले जात असल्याने व्यावसायिक वापरासाठी असलेल्या पाण्याच्या दराने पैसे भरण्याच्या सूचना केल्या आहेत. तथापि, महापालिका फक्त अडीच टक्के पाण्याचा वापर व्यावसायिक होत असल्याचा दावा करीत आहे, मात्र व्यावसायिक दराने त्याचे पैसे भरण्यास खळखळ करीत असल्याने पाटबंधारे खात्याचे महापालिकेकडे ५८ कोटींच्या आसपास घेणे शिल्लक आहे. महापालिका दरवर्षी आठ ते नऊ कोटी रुपये घरगुती वापराच्या दराने पैसे अदा करीत आहे, परंतु व्यावसायिक वापराचे पैसे भरत नसल्याचे पाटबंधारे खात्याचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे नाशिककरांकडून महापालिका घरगुती व व्यावसायिक अशी दोन्ही पाणीपट्टी वसूल करीत असल्याची बाब पाटबंधारे खात्याला अधिक खटकत आहे.

Web Title: Municipal corporation has got tired watercr price of 58 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.