शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मुंडे बचाव : ‘वॉक फॉर कमिश्नर’ला पोलिसांचा ‘रेड सिग्नल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 22:17 IST

नाशिक : महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना जेमतेम बोटावर मोजण्याइतके महिने झाले असताना सत्ताधारी भाजपा सरकारने त्यांच्याविरोधात षडयंत्र रचून अविश्वास ठराव पारित करण्यासाठी महासभा बोलविल्याचा आरोप करत शहरातील विविध सामाजिक संघटनांसह, डाव्या, पुरोगामी संघटना व नाशिककरांनी सोशल मीडियावर उभारलेल्या चळवळीनंतर ‘वॉक फॉर कमिश्नर’ असा मोर्चा काढण्यात येणार होता; मात्र या ...

ठळक मुद्दे ‘वॉक फॉर कमिश्नर’ असा मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नियोजीत वेळेत मोर्चा नियोजित ठिकाणावरुन निघणार असल्याचे स्पष्ट

नाशिक : महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना जेमतेम बोटावर मोजण्याइतके महिने झाले असताना सत्ताधारी भाजपा सरकारने त्यांच्याविरोधात षडयंत्र रचून अविश्वास ठराव पारित करण्यासाठी महासभा बोलविल्याचा आरोप करत शहरातील विविध सामाजिक संघटनांसह, डाव्या, पुरोगामी संघटना व नाशिककरांनी सोशल मीडियावर उभारलेल्या चळवळीनंतर ‘वॉक फॉर कमिश्नर’ असा मोर्चा काढण्यात येणार होता; मात्र या मोर्चाला मुंबईनाका पोलिसांनी लेखी स्वरुपात परवानगी नाकारली आहे. ‘आम्ही नाशिककर’ म्हणून एकत्र आलेल्या संयोजकांनी लोकशाहीत मोर्चा काढण्याचा अधिकार असल्याचे सांगत नियोजीत वेळेत मोर्चा नियोजित ठिकाणावरुन आज निघणार असल्याचे स्पष्ट केले.मंगळवारी (दि.२८) संध्याकाळी शासकिय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत ‘वॉक फॉर कमिश्नर’ असा मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महापालिकेची सूत्रे हाती घेऊन मुंढे यांना सात महिन्यांचा कालावधी झाला आहे. मुंढे यांना नाशिकच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: नाशिकला पाठविले; मात्र सत्ताधारी भाजपा मुंढे यांच्याविरोधात का? असा सवाल यावेळी बैठकीत उपस्थित करण्यात आला होता. यानुसार मुंबईनाका पोलीस ठाण्याकडे परवानगी अर्ज संयोजकांकडून सादर करण्यात आला होता. या अर्जाला वरिष्ठ पोलीस निरिक्षक कारंजे यांनी लेखी उत्तर देत परवानगी नाकारली आहे. यामुळे मोर्चाबाबत संभ्रम निर्माण झाला असला तरी संयोजकांनी मोर्चा नियोजित अनंत कान्हेरे मैदानावरुन उद्या सकाळी दहा वाजता काढण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेNashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका