अल्पसंख्याक शासकीय कर्मचार्‍यांनी संघटित व्हावे मुनाफ हकीम : राज्यस्तरीय मेळाव्यामध्ये प्रतिपादन

By Admin | Updated: May 25, 2014 22:21 IST2014-05-25T22:18:52+5:302014-05-25T22:21:49+5:30

नाशिक : शासनाने अल्पसंख्याक समाजाच्या प्रगतीसाठी विविध योजना तयार केल्या असून, स्वतंत्रपणे अल्पसंख्याक आयोगाची स्थापना केली आहे. मात्र अल्पसंख्याक समाजामध्ये अद्याप याविषयीची पुरेशी जागृती नसल्यामुळे त्यांना योजनांचा लाभ मिळत नाही. शासकीय अल्पसंख्याक अधिकारी-कर्मचार्‍यांनी संघटित होऊन विविध योजनांचा लाभ समाजाला मिळवून द्यावा तसेच शासकीय-निमशासकीय कर्मचारी-अधिकार्‍यांच्या न्याय्य हक्कांसाठी शासनदरबारी संघटितपणे पाठपुरावा करावा, असे प्रतिपादन राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मुनाफ हकीम यांनी केले.

Munaf Hakman to be organized by minority government employees: Presenting in State Level Meetings | अल्पसंख्याक शासकीय कर्मचार्‍यांनी संघटित व्हावे मुनाफ हकीम : राज्यस्तरीय मेळाव्यामध्ये प्रतिपादन

अल्पसंख्याक शासकीय कर्मचार्‍यांनी संघटित व्हावे मुनाफ हकीम : राज्यस्तरीय मेळाव्यामध्ये प्रतिपादन

नाशिक : शासनाने अल्पसंख्याक समाजाच्या प्रगतीसाठी विविध योजना तयार केल्या असून, स्वतंत्रपणे अल्पसंख्याक आयोगाची स्थापना केली आहे. मात्र अल्पसंख्याक समाजामध्ये अद्याप याविषयीची पुरेशी जागृती नसल्यामुळे त्यांना योजनांचा लाभ मिळत नाही. शासकीय अल्पसंख्याक अधिकारी-कर्मचार्‍यांनी संघटित होऊन विविध योजनांचा लाभ समाजाला मिळवून द्यावा तसेच शासकीय-निमशासकीय कर्मचारी-अधिकार्‍यांच्या न्याय्य हक्कांसाठी शासनदरबारी संघटितपणे पाठपुरावा करावा, असे प्रतिपादन राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मुनाफ हकीम यांनी केले.
वडाळारोडवरील सय्यद सादिकशाह हुसेनी सभागृहात शासकीय, निमशासकीय क र्मचारी असोसिएशनच्या नाशिक शाखेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय मेळाव्याप्रसंगी हकीम प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी ते म्हणाले, अल्पसंख्याक शासकीय अधिकारी व कर्मचारी हे राज्यात सुसंघटित नसल्यामुळे त्यांच्या विविध मागण्या शासनदरबारी अद्याप पूर्ण होत नसून असोसिएशनने पाठपुरावा करण्यावर भर द्यावा, जेणेकरून प्रलंबित मागण्या तातडीने पूर्णत्वास येतील. अल्पसंख्याक मुस्लीम समाज उच्च शिक्षणाच्या बाबतीत पिछाडीवर असून, शासकीय नोकर्‍यांमध्येदेखील कमी प्रमाणात आहे. शासकीय नोकर्‍यांत समाजाचा टक्का वाढविण्यासाठी समाजबांधवांनी आपल्या मुलांना दर्जेदार उच्च शिक्षण मनात कोणताही न्यूनगंड न ठेवता देण्याचा प्रयत्न करावा. यावेळी व्यासपीठावर अल्पसंख्याक विभागाचे अपर सचिव अनिस शेख, सचिव मोहम्मद हुसेन मुजावर, फय्याज अली, डॉ. नसीम कुरेशी, शाखाप्रमुख जावेद कादरी, नईम शेख आदि व्यासपीठावर उपस्थित होते. अब्दुल हमीद शेख यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Munaf Hakman to be organized by minority government employees: Presenting in State Level Meetings