मुंबईतील दुर्घटना हे शिवसेनेचेच अपयश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:01 IST2017-09-02T00:01:01+5:302017-09-02T00:01:31+5:30
भेंडी बाजाराची इमारत कोसळून २३ जणांचा मृत्यू आणि मुंबई तुंबल्याने गेलेले डझनभर मुंबईकरांचे प्राण हे मुंबई महापालिका व शिवसेनेचे अपयश आहे. महापालिकेवर पहारेकºयाची भूमिका बजावणारे भाजपाचे पहारेकरी झोपले आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.

मुंबईतील दुर्घटना हे शिवसेनेचेच अपयश
नाशिक : भेंडी बाजाराची इमारत कोसळून २३ जणांचा मृत्यू आणि मुंबई तुंबल्याने गेलेले डझनभर मुंबईकरांचे प्राण हे मुंबई महापालिका व शिवसेनेचे अपयश आहे. महापालिकेवर पहारेकºयाची भूमिका बजावणारे भाजपाचे पहारेकरी झोपले आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
मागील वर्षी मिठी नदीच्या सफाईसाठी ६५० कोटी खर्च केले. तरीही मुंबईचे नाले तुंबल्याने या नालेसफाईत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला आहे. याबाबतचा अहवाल विधानसभेत ठेवण्याची मागणी करूनही तो सरकारने ठेवला नसल्याने या आरोपांना पुष्टीच मिळत असल्याचा दावा आमदार विखे-पाटील यांनी केला. ज्यांच्या ताब्यात मुंबई महापालिका आहे. त्यांना शहरात काय चाललेय, याची कल्पनाच नाही. मिठी नदीच्या नालेसफाईच्या ६५० कोटींच्या कामांची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. सत्तेत असलेल्या शिवसेनेला मुंबईकरांचे बळी जात असताना या विषयाशी काही घेणे-देणे नाही. त्यांच्या काळात भ्रष्टाचार झाला आहे, तर महापालिकेवर पहारेकºयाची भूमिका घेणारे भाजपाचे पहारेकरी झोपल्याचा आरोप त्यांनी केला. प्रकाश मेहतांची लोकायुक्तांमार्फत चौकशी करायची आणि सुभाष देसार्इंची निवृत्त अधिकाºयामार्फत चौकशी करण्याचा निर्णय भाजपाने शिवसेनेच्या दबावाखाली घेतल्याचा आरोपही यावेळी विखे-पाटील यांनी केला, असा निर्णय घेऊन मुख्यमंत्री स्वपक्षियांवरच अन्याय करीत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी शहराध्यक्ष शरद अहेर, माजीमंत्री डॉ. शोभा बच्छाव, प्रदेश चिटणीस डॉ. हेमलता पाटील, डॉ. प्रतापराव वाघ, बबलू खैरे आदी उपस्थित होते.