मुंबई-मनमाड डिझेल पाईपलाईन फुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 16:13 IST2017-12-07T16:13:30+5:302017-12-07T16:13:38+5:30
सायखेडा : भारत पेट्रोलियम कंपनीची मुंबई ते मनमाड डिझेल पाईपलाईन निफाड तालुक्यातील खानगाव येथे सकाळी ९ वाजेच्या दरम्यान फुटल्याने मोठ्या प्रमाणात डिझेल गळती झाली आहे. डिझेल वाया गेले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

मुंबई-मनमाड डिझेल पाईपलाईन फुटली
सायखेडा : भारत पेट्रोलियम कंपनीची मुंबई ते मनमाड डिझेल पाईपलाईन निफाड तालुक्यातील खानगाव येथे सकाळी ९ वाजेच्या दरम्यान फुटल्याने मोठ्या प्रमाणात डिझेल गळती झाली आहे. डिझेल वाया गेले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
निफाड तालुक्यातील आज खानगाव येथील शेतजमिनीत भारत पेट्रोलियम कंपनीची पाईपलाईन फुटली असून मोठ्या प्रमाणात डिझेल वाया गेले आहे. जवळच नांदूरमधमेशवर धरण परिसर असल्याने जमिनीत पाणी असल्याने डिझेल पाण्यात मिसळून वाया गेले आहे. याठिकाणी भारत पेट्रोलियमचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मुख्य पाईपलाईन बंद केली असली तरी पाईपलाईनमधील शिल्लक डिझेल बाहेर येत असल्याने दुरुस्ती करण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे पाईपलाईनद्वारे येणारे डिझेल टँकरमध्ये भरून पाठवले जात आहे. या ठिकाणी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर झाली असल्याने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र डिझेलची मोठी नासाडी झाली आहे. दुरु स्तीचे काम वेगाने सुरु आहे. सुरक्षा रक्षकांच्या वेढ्यात टँकरमध्ये डिझेल भरले जात आहे.