शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

इच्छुकांच्या नजरा लागल्या मुंबईकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 01:06 IST

कॉँग्रेस आघाडीसह युतीच्या इच्छुक उमेदवारांचे लक्ष श्रेष्ठींच्या मुंबईत सुरू असलेल्या बैठकांकडे लागले असून, कोणती जागा कुणाला सुटणार आणि कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार याची उत्सुकता कमालीची ताणली गेली आहे.

नाशिक : कॉँग्रेस आघाडीसह युतीच्या इच्छुक उमेदवारांचे लक्ष श्रेष्ठींच्या मुंबईत सुरू असलेल्या बैठकांकडे लागले असून, कोणती जागा कुणाला सुटणार आणि कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार याची उत्सुकता कमालीची ताणली गेली आहे. प्रमुख राजकीय पक्षांच्या इच्छुकांनी आपापल्या परीने उमेदवारीसाठी प्रयत्न चालविले असताना सर्वाधिक चुरस सेना-भाजपमध्ये असल्याने नाशिककरांच्या नजरा मुंबईतून होणाऱ्या घोषणेकडे लागले आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता अवघे पाचच दिवस राहिल्याने इच्छुकांची घालमेल वाढली आहे.विधानसभा निवडणुकीची उमेदवारी कुणाला द्यायची याबाबत भाजप आणि सेनेने काही निकष निश्चित केले असल्याने या निकषात बसणाऱ्यांनाच उमेदवारी मिळणार असल्यामुळे इच्छुकांमध्ये मोठी अस्वस्थता आहे. क्षणाक्षणाला बदलणाºया राजकीय परिस्थितीवर दोन्ही पक्षांकडून भूमिका घेतली जात असल्यामुळे उमेदवारीसाठी इच्छुकांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. सेना-भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांना सद्यस्थितीत कोणतीही शाश्वती देता येणे शक्य नसल्याने त्यांचे कार्यकर्तेही संभ्रमात असल्याचे चित्र आहे. दोन दिवसांनासून नाशिकमधील अनेक इच्छुक मुंबईत तळ ठोकून असून, आपापल्या राजकीय संपर्काचा वापर करीत तिकिटासाठी प्रयत्नशील आहेत.त्या तुलनेत कॉँग्रेस आघाडीच्या इच्छुकांमध्ये चुरस कमी असल्यामुळे तिकिटासाठी ठराविक नावांपैकीच नावे निश्चित होण्याची शक्यता आहे. काहींना शब्दही देण्यात आल्यामुळे त्यांच्या नावाची केवळ अधिकृत घोषणा होण्याचे बाकी आहे. आघाडीची पहिली यादी रात्री उशिरा जाहीर होणार असल्यामुळे पहिल्या यादीत कुणाचे नाव असू शकेल याकडे नाशिककरांचे लक्ष असणार आहे. जिल्ह्यातील ज्या जागांच्या अदलाबदलीची चर्चा आहे, त्या जागांकडेदेखील सर्वांचे लक्ष लागून आहे.मुंबईत रविवारी मनसेच्या कार्यालयात इच्छुकांची प्रचंड गर्दी लक्षात घेता नाशिकमधील नावांच्या बाबतीतील उत्सुकताही ताणली गेली आहे.वंचित आघाडीसह अन्य राजकीय पक्षांनीदेखील काही नावे निश्चित केली आहेत. या पक्षाच्या इच्छुक उमेदवारी अर्जाच्या पहिल्या दिवशी अर्जदेखील नेले आहेत. त्यामुळे वंचितच्या उमेदवारीविषयी फारसा सस्पेन्स नसला तरी ऐनवेळी इनकमिंग झाले तर नावात बदल होतो का एवढीच काय ती उत्सूकता आहे. मनसेचीदेखील यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. काही नावे चर्चेत असली तरी अंतिमक्षणी कोणते नाव समोर येणार याबाबतची उत्सुकता नक्कीच आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस