शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-आग्रा महामार्ग : भरधाव वाहनाच्या धडकेत सहा महिन्याचा बिबट्या ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 16:39 IST

वनविभागाने तातडीने नाशिक पश्चिम विभागाच्या हद्दीत पांडवलेणीपासू पुढे विल्होळी व थेट इगतपुरीपर्यंत महामार्गावर वन्यजीवांचा वावर असलेल्या भागात वाहनचालकांना सावधानतेचा इशारा देणारे फलक उभारणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देमुंबई-आग्रा महामार्गावर पहाटे अपघात विल्होळी व थेट इगतपुरीपर्यंत वन्यजीवांचा वावर बिबट्याच्या मृतदेहाचा पंचनामा

नाशिक : भरधाव वाहनाच्या धडकेत बुधवारी (दि.२८) पहाटेच्या सुमारास सहा महिन्यांचा बिबट्याचा नर बछडा जागीच ठार झाला. घटनेची माहिती समजताच इगतपुरी वनपरिक्षेत्राच्या वन अधिकारी-कर्मचा-यांनी घटनास्थळी सकाळी धाव घेऊन पंचनामा केला.इगतपुरी वनपरिक्षेत्राच्या हद्दीत विल्होळी, वाडीव-हे, गोंदे, पाडळी, मुंढेगाव, घोटी या भागात बिबट्याचा वावर आढळतो. भक्ष्याचा पाठलाग करताना किंवा पाण्याच्या शोधात सहा महिन्यांचा बछडा मुंढेगाव शिवारातून महामार्ग ओलांडत असतान अज्ञात भरधाव वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत बिबट्याच्या तोंडाला जबर मार लागल्याने तो जागीच गतप्राण झाला. परिसरातील नागरिकांच्या ही घटना लक्षात येताच त्यांनी तत्काळ बिबट्याचे शव महामार्गावरुन बाजूला करत रस्त्याच्या कडेला आणून ठेवले. घटनेची माहिती त्वरित वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे यांना कळविण्यात आली. तत्काळ सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास वनविभागाचे अधिकारी-क र्मचा-यांनी घटनास्थळी दाखल होऊन बिबट्याच्या मृतदेहाचा पंचनामा केला. वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याचे पंचनाम्यात नमुद करण्यात आले. तत्काळ बिबट्याचा मृतदेह वनकर्मचा-यांनी ताब्यात घेऊन वाहनातून अंत्यसंस्कारासाठी हलविला.महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर वाहनाच्या वेगमर्यादा प्रचंड वाढली असून या भागात वनविभागाकडून वन्यप्राण्यांचा वावर असल्याचा सावधानतेचा इशारा देणारे फलकही अद्याप लावण्यात आलेले नाही. त्यामुळे वाहनचालकांना याबाबत कुठलीही माहिती मिळत नाही. अचानकपणे महामार्गावर रात्री, मध्यरात्री किंवा पहाटेच्या सुमारास बिबट्या, रानमांजर, तरस यांसारखे वन्यजीव महामार्ग ओलांडताना अपघाताच्या घटना घडतात.

महामार्गावरुन मार्गस्थ होताना वेगावर नियंत्रण ठेवणे हे वाहनचालकांसह वन्यजीवांसाठी फायद्याचे ठरणारे आहे. वाहनचालकांनी वन्यजीव अचानकपणे रस्त्यावर दिसल्यास किंवा वाहनाच्या प्रकाशात त्याचे डोळे लख्ख स्वरुपात चमक ल्यास वेग कमी करण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरुन अपघातात वन्यजीवांचा बळी जाण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असे वन्यजीवप्रेमींचे म्हणणे आहे.वनविभागाने तातडीने नाशिक पश्चिम विभागाच्या हद्दीत पांडवलेणीपासून पुढे विल्होळी व थेट इगतपुरीपर्यंत महामार्गावर वन्यजीवांचा वावर असलेल्या भागात वाहनचालकांना सावधानतेचा इशारा देणारे फलक उभारणे गरजेचे आहे. जेणेकरुन वाहनचालकांना वन्यजीवांची वावर असल्याबाबतची माहिती मिळण्यास मदत होईल. 

टॅग्स :wildlifeवन्यजीवhighwayमहामार्गleopardबिबट्याAccidentअपघातDeathमृत्यू