अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या बदलीला मुहूर्त

By Admin | Updated: August 12, 2014 02:02 IST2014-08-12T01:40:48+5:302014-08-12T02:02:02+5:30

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या बदलीला मुहूर्त

Muhurat switched for additional Chief Executive Officer | अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या बदलीला मुहूर्त

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या बदलीला मुहूर्त

 

नाशिक : राज्यातील नऊ वर्ग एक अधिकाऱ्यांच्या बदल्यांची कार्यवाही करण्यात आली असून, त्यात नाशिक जिल्हा परिषदेचे गेल्या एक वर्षापासून रिक्त असलेल्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदी जळगावचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील गायकवाड यांची बदली झाली आहे.
ग्रामविकास विभागाने ८ आॅगस्ट रोजी काढलेल्या या नऊ अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी पुढीलप्रमाणे कंसात बदलीचे ठिकाण- औरंगाबाद उपआयुक्त एस. बी. देशमुख (अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, औरंगाबाद), उस्मानबाद जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एस. बी. हजारे (अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, बुलढाणा), वाशिम अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एस. पवार (अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, अकोला), नागपूर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एन. उबाळे (अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी उस्मानाबाद), चंद्रपूर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक अंकुश केदार (अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, नागपूर), प्रकल्प संचालक पु. ल. देशपांडे अकादमी मुंबई श्रीमती एस. के. अग्रवाल (अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, परभणी), अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धुळे बी. बी. मेमाने (उपआयुक्त, औरंगाबाद), अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बीड ए. डी. कोल्हे (अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जालना) आदिंची समावेश आहे.
गेल्या वर्षभरापासून रिक्त असलेल्या नाशिक जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी सांभाळत होते. आता त्या जागी जळगावचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील गायकवाड यांची नाशिकला बदली झाली असून, ते लवकरच पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Muhurat switched for additional Chief Executive Officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.