इंदिरानगर : समांतर मार्गापासून ते वडाळा-पाथर्डीदरम्यान भारतनगर घरकुल योजनेकडे जाणारा रस्ता डांबरीकरणाअभावी पहिल्या पावासातच चिखलमय झाल्याने वाहनधारकांसह पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे.दोन वर्षांपूर्वी वडाळा-पाथर्डीदरम्यान मुंबई महामार्ग समांतर रस्त्यास भारतनगर, शिवाजीवाडी मार्गे शंभर फूट रस्त्याच्या रुंदीकरणास अडथळा ठरणारी झोपडपट्टी मनपाने हटवून रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्यात आले. पुणे महामार्ग-मुंबई महामार्गाला जोडणारा हा जवळचा मार्ग असल्याने शिवाजीवाडी, भारतनगरमार्गे वाहनांची वर्दळ वाढली आहे. परिसरातील मजुरी करणाºया रहिवाशांना रोजगारासाठी अंबड, सातपूरच्या औद्योगिक वसाहतीत ये-जा करण्यासाठी हा मार्ग जवळचा असल्याने वर्दळ वाढली.मात्र मुंबई महामार्ग समांतर रस्ता ते भारतनगर घरकुल योजनेच्या दरम्यान रस्त्याचे रुंदीकरण डांबरीकरण झालेले नाही. त्यामुळे पावसाळ्यात सदर रस्त्यावर लहान-मोठ्या खड्ड्यांसह चिखलाचे साम्राज्य पसरते. त्यामुळे वाहन घसरून व पाय घसरून पडण्याच्या घटना घडतात. येथून मार्गक्रमण करताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. रस्त्याचे त्वरित डांबरीकरण करावे, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.
समांतर मार्ग ते भारतनगर घरकुल योजना रस्त्यावर चिखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 00:29 IST
समांतर मार्गापासून ते वडाळा-पाथर्डीदरम्यान भारतनगर घरकुल योजनेकडे जाणारा रस्ता डांबरीकरणाअभावी पहिल्या पावासातच चिखलमय झाल्याने वाहनधारकांसह पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे.
समांतर मार्ग ते भारतनगर घरकुल योजना रस्त्यावर चिखल
ठळक मुद्देतारेवरची कसरत : वाहनधारकांसह पादचाऱ्यांची गैरसोय