कादवा पुलावरून टेम्पो नदीत कोसळला

कादवा पुलावरून टेम्पो नदीत कोसळला

ठळक मुद्देनिफाड : दोघे जण जखमी

निफाड : येथील कादवा पुलावरून गुरुवारी रात्री सात वाजेच्यादरम्यान जाणारा आयशर टेम्पो कादवा नदी पडून दोघे जण जखमी झाले. पात्रात पडल्याने या गाडीतील दोघे जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. आयशर टेम्पो क्रमांक एम.एच.०४ एफ.डी. ९३८७ वाहन ट्रान्सपोटर्चा माल घेऊन नाशिक बाजूकडून नागपूरकडे जात होता. गुरूवारी रात्री सातच्या सुमारास निफाडच्या जुन्या कादवा पुलावरून जात असताना अचानक आयशरने पुलाच्या कठड्याला धडक दिली. आयशर काही कळायच्या आत पुलावरून खाली नदीत कोरडया जागेत कोसळली. ही घटना तातडीने निफाड पोलीस ठाण्यास कळवण्यात आल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे,,पोलीस कमर्चारी दीपक पगार, नितीन मंडलिक ,ज्ञानेश्वर सानप, सचिन बैरागी, मनोज आहेर, मचिंद्र खरात तातडीने घटनास्थळी पोहचले. या कर्मचाऱ्यांनी व नागरिकांनी आयशरचा चालक सचिन साहेबराव बिरारी, व आयशरचे मालक देवेंद्र प्रसादराव देशमुख या दोघांना गाडीच्या केबिनमधून बाहेर काढले. या दोघाही जखमींना उपचारासाठी हलवले या दोघांवर निफाड येथे खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
 

Web Title: The mud fell into the Tempo River from the bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.