शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

औद्योगिक विकासाचा पाया असलेल्या एमएसएमई रोजगार देणारा स्त्रोत : अशुतोष राराविकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 4:29 PM

राष्ट्रीय उत्पन्नात 38 टक्के भाग हा सुक्ष्म, लघु व मध्येम स्वरुपाच्या उद्योगांचा देशात एकूण 5 कोटी एमएसएमई च्यामाध्यमातून 12 कोटी रोजगार उपलब्ध होत असल्याने एमएसएमई हा देशातील रोजगार निर्मिताचा मोठा स्त्रोत आहे

ठळक मुद्दे बँक आणि उद्योग यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण व्हावेसरकार, बँका आणि उदयोग यांत संवाद आवश्यकबीबीएनजीच्या राष्ट्रीय परिषदेत रारावीकर यांचे प्रतिपादन

नाशिक : भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात 38 टक्के भाग हा सुक्ष्म, लघु व मध्येम स्वरुपाच्या उद्योगांचा देशात एकूण 5 कोटी एमएसएमई च्यामाध्यमातून 12 कोटी रोजगार उपलब्ध होत असल्याने एमएसएमई हा देशातील रोजगार निर्मिताचा मोठा स्त्रोत आहे. त्यामुळेच केंद्र सरकार औद्योगिक विकासासोबच रोजगार निमितीसाठी सुक्ष, लघु व मध्यम उद्योगांना विवध योजनांच्या माध्यमातून पाठबळ उभे करीत असल्याचे प्रतिपादन रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक तथा केंद्रीय अर्थखात्याचे सल्लागार अशुतोष राराविकर यांनी केले.राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील ब्राम्हण व्यावसायिकांच्या ब्राम्हण बिझनेस नेटवर्क ग्लोबलतर्फे (बीबीएनजी) सातपूर येथे रविवारी (दि. 11) राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपच्या उद्योग आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार यांच्यासग व्यासपीठावर संदीप फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप झा, बीबीएनजीचे अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी, अशोका बिल्डकॉनचे संचालक संजय लोंढे, मुकुंद कुलकर्णी, विराज लोमटे आदी उपस्थित होते. राराविकर म्हणाले, देशातील लघुउद्योगांच्या विकासासाठी बँक आणि उद्योग यांच्यामध्ये विश्वासाचे नाते निर्माण व्हायला पाहिजे. यातूनच मोठया प्रमाणात विकास साधता येईल. सोबतच सरकार, बँका आणि उदयोग क्षेत्रतील विविध संघटना यांच्यात चांगला संवाद झाला तरच मोठ्या आणि लघु उद्योगात येणा:या अडचणीवर सहज मात करता येईल. उद्योजकांसाठी अनेक योजना असून अनेकदा या सर्व गोष्टी उद्योजकांना माहीत नसतात. त्यामुळे उद्योजकांच्या संघटनांनी ही त्रूटी दूर करण्याची गरज आहे. जे उदयोग अडचणीत आहेत त्यांना मदत करणो गरजेचे आहेत. त्यासाठी आरबीआयने बँकांना सुक्ष्ण व लघु उद्योगांना आर्थिक सहकार्य करण्याच्या सूचनाही केल्या असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले, तसेच उदयोग संघटनांनी व्यवसाय क्लस्टर उभारून त्यातून कौशल्य विकासावर भर देत नवीन उदयोग व उद्योगावचा विस्तार करण्याचा सल्ला देतानाच नाशिकमध्ये संरक्षण, अन्न प्रक्रि या, शेती विषयक उदयोगास भरपूर वाव असून या क्षेत्रतील उद्योजकांना मोठया प्रमाणात संधी व सवलती उपलब्ध असल्याचे अशुतोष रावेरीकर यांनी अधोरेखित केले. आरबीआयच्या सूचनेनुसार एसएमई कॉर्नर सुरू करण्यात आले असून तीन दिवसात कर्ज उपलब्ध करून देण्याची यंत्रणा राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. श्रीपाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.

 

टॅग्स :businessव्यवसायNashikनाशिकMIDCएमआयडीसी