शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचा अंदाजे विजबिलांतून ग्राहकांना शॉक ; संतप्त ग्राहकांचा कार्यालयात गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 14:11 IST

गेल्या तीन महिन्यांपासून ग्राहकांना ऑनलाइन पद्धतीने  अंदाजे वीज देयके पाठवून लॉक डाऊन मध्ये एक प्रकारे आर्थिक शॉक दिला आहे.तर जास्तीचे बिल आल्याने संतप्त ग्राहकांनी देखील वीज वितरण कंपनीला प्रत्युत्तर म्हणून मंगळवारी सकाळी दिंडोरी रोडवरील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात जाऊन गोंधळ घातला.  तसेच वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यां भोवती गराडा घालून गोंधळ घातल्यानंतर वीज वितरण कंपनी कर्मचाऱ्यांनी देखील आडमुठे धोरण पत्करत काही काळ कामकाज बंद करून थेट पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

ठळक मुद्देवीज ग्राहकांना महावितरणकडून अंदाजे बील वाढीव बिलांमुळे संतप्त ग्राहकांचा कार्यालयात गोंधळ महावितरण कार्यालयातील कर्मचाऱ्यांची पोलिसांत धाव

नाशिक : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वीज वितरण कंपनीने गेल्या तीन महिन्यांपासून ग्राहकांना ऑनलाइन पद्धतीने  अंदाजे वीज देयके पाठवून लॉक डाऊन मध्ये एक प्रकारे आर्थिक शॉक दिला आहे.तर जास्तीचे बिल आल्याने संतप्त ग्राहकांनी देखील वीज वितरण कंपनीला प्रत्युत्तर म्हणून मंगळवारी सकाळी दिंडोरी रोडवरील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात जाऊन गोंधळ घातला.वीज देयके भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांनी कार्यालयात वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांभोवती गराडा घालून गोंधळ घातल्यानंतर वीज वितरण कंपनी कर्मचाऱ्यांनी देखील आडमुठे धोरण पत्करत काही काळ कामकाज बंद करत थेट पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेतली.  गेल्या एप्रिल महिन्यापासून ग्राहकांना घरपोच वीज देयके कंपनीकडून देण्यात आलेले नाही ग्राहकांना केवळ ऑनलाईन पद्धतीने अंदाजे बिलाची रक्कम कळविण्यात आली होती त्यानुसार शेकडो ग्राहकांनी वीज बिलांचा भरणा देखील केला आहे ज्या ग्राहकांना तीनशे ते चारशे रुपये बिल यायचे त्यांना दुप्पट बिल पाठविण्यात आलेली होती तरीदेखील अनेक ग्राहकांनी वीज वितरण कंपनीला बिल रक्कम अदा केली आहे. याशिवाय शासनाने देखील ग्राहकांना वीज बिल भरणा करण्यासाठी मुदत दिली होती तर वीज वितरण कंपनीने सर्व ग्राहकांना आगामी बिलात मागील महिन्यात भरलेल्या बिलाची रक्कम वळती करण्यात येऊन बिल अदा केले जाईल असे स्पष्ट केले होते मात्र त्यानंतर देखील ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज देयके पाठवून वीज वितरण कंपनीने लॉक डाऊन मध्ये ग्राहकांना आर्थिक शॉक दिल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे मंगळवारी सकाळी वितरण कार्यालयात जास्तीचे विधेयके आल्याने एका महिलेने संबंधित कर्मचाऱ्यांना विचारणा केली त्यावेळी शाब्दिक वाद निर्माण झाला शेकडो नागरिकांनी वीज वितरण कंपनीच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत गोंधळ घातल्याने काहीसे वादाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी एका महिलेने आम्हाला शिवीगाळ केल्याचा आरोप करत काही वेळ काम बंद केल्याचे देखील समजते सदर प्रकारानंतर संतप्त ग्राहक आणि वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी एकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.

टॅग्स :electricityवीजNashikनाशिकconsumerग्राहकbillबिलPoliceपोलिस