महावितरणचे दुर्लक्ष रेड्याच्या जिवावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 02:19 IST2020-07-13T22:13:58+5:302020-07-14T02:19:19+5:30
वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूलजवळील चिरापाली येथे महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे एका रेड्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला, तर १४ वर्षीय युवती थोडक्यात बचावली आहे.

महावितरणचे दुर्लक्ष रेड्याच्या जिवावर
वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूलजवळील चिरापाली येथे महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे एका रेड्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला, तर १४ वर्षीय युवती थोडक्यात बचावली आहे. यामुळे हरसूल भागातील महावितरण कंपनीचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. संबंधित विभागाकडे चिरापाली ग्रामपंचायतीने अगोदरच विजेचा खांब कोसळून वाहिन्या उघड्यावर पडल्याच्या घटनेबाबत पत्रव्यवहार केला होता तरीही महावितरणकडून पत्राला केराची टोपली दाखविण्यात आल्याचे समोर आले आहे.
चिरापाली शिवारातील चिखली भागात उत्तम राजाराम भोये यांच्या रेड्याला विजेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाला.
जनावरे चारण्यासाठी आलेली १४ वर्षीय सुनीता भोये थोडक्यात बचावली आहे.
चिरापाली शिवारात हरसूल महावितरण कार्यालय कार्यक्षेत्रातून वीजपुरवठा करण्यात येतो. येथील वीज खांबांची दुरवस्था झालेली आहे. शेतकऱ्यांनी अपघात घडण्याची शक्यता लक्षात घेऊन महावितरण विभागाला प्रत्यक्ष कळविले होते; मात्र याची दखल घेण्यात न आल्याने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पत्रव्यवहार करण्यात आला होता.
------------------
शेतकऱ्यांनी ही बाब ग्रामपंचायतीच्या लक्षात आणून दिल्यानंतर महावितरण कंपनीच्या हरसूल कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला होता. पत्रव्यवहाराची वेळीच संबंधित विभागाने दखल घेतली असती तर
ही घटना घडली नसती. हा केवळ महावितरण कर्मचाºयासह अधिकाºयांचा हलगर्जीपणा आहे.
- मोहन कनोजे,
सरपंच, चिरापाली
-------------------
मे महिन्यात या शेताकडे वीजपुरवठा करणाºया खांबासह वीज वाहिन्यांची दुरवस्था होऊन जमीनदोस्त
झाल्या होत्या; मात्र त्यांच्यातूनच वीजपुरवठा सुरू होता. याबाबत
वीज कर्मचाºयांना वेळोवेळी सांगूनही त्यांनी हलगर्जीपणा केला.
आज ऐनवेळी या घटनेने वीजपुरवठा खंडित
होऊन शेतीची काम खोळंबली असून, महावितरणच यास जबाबदार आहे.
- उत्तम भोये, चिरापाली