Mrityunjay Dutt will receive an award from the government | मृत्युंजय दूतांना मिळणार शासनाकडून पुरस्कार

कोकणगांव येथे आयोजित हायवे मृत्युंजय दूत उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी बोलतांना शांताराम वळवी, समवेत सुनिल बच्छाव, वर्षा कदम, नवनाथ केदार आदी.

ठळक मुद्देओझरटाऊनशिप : उत्कृष्ट काम करणाऱ्यांची दखल ; ओळखपत्राचे वाटप

ओझरटाऊनशिप : महामार्गावरील वाढते अपघात व मृत्युचे प्रमाणाला आळा घालण्यासाठी तसेच ग्रस्तांना तात्काळ मदत पुरवून मृत्युंदर कमी करणे, अपघात ग्रस्त व्यक्तीला प्रथमोपचार देऊन शास्त्रोक्त पद्धतीने प्रशिक्षण देऊन आवश्यक साहित्य पुरवणेसाठी अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक महाराष्ट्र राज्य मुंबईचे डॉ. भुषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेतून हायवे मृत्युंजय दूत हा उपक्रम १ मार्च पासून राबविण्यात येत असून राज्यातील हॉटेल, ढाबे, पेट्रोलपप, मॉल्सव हायवेच्या लगतच्या गांवातील चार पाच लोकांचा ग्रुप तयार करण्यात येईल त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण देऊन ओळखपत्र देण्यात येणारआहे.

उत्कृष्ट काम करणाऱ्या देवदुतांना प्रोत्साहनपर प्रशस्तीपत्र, उल्लेखनिय कामगीरी केल्याबद्दल शासनाकडून देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी शिफारस करून राज्याच्या आरोग्य विभागाकडून जाहिर केलेली स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात योजनाबाबतची माहिती पुरवण्यात येईल अशी माहिती नाशिक विभाग वाहतूक महामार्गाचे पोलीस उपअधिक्षक शांताराम वळवी यांनी दिली.
महामार्ग पोलीस मदत केंद्र पिंपळगांव बसवंत यांचे वतीने समर्थ लॉन्स कोकणगांव येथे आयोजित हायवे मृत्युंजय दूत उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक वर्षा कदम यांनी उपक्रमाची माहिती

दिली. त्यानंतर जनसेवक शब्बीर खाटीक, गफारशेख, माणिक सरोदे, शाम उगले, गफार पठाण, प्रशांत ठाकरे यांनी वाहतुकीसंदर्भातील अडचणी कथन केल्या.
यावेळी महामार्गचे संजय गुंजाळ, अरुण शिंदे, महेश सोनार, कमलाकर मोरे, उमेश सानप, दिपक केदारे, दिपक आव्हाड, सतीश पवार, पंकज सरी, दिपक गुंजाळ, शशांक जगताप, विलास कावळे, अंकुश गोधडे, मझहर शेख आदी उपस्थित होते.

 

Web Title: Mrityunjay Dutt will receive an award from the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.