शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

शिवसेनेच्या विधीमंडळ कार्यलयातून उद्धव ठाकरेंचे फोटो हटवले; संजय राऊत मुख्यमंत्र्यांवर संतापले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 19:57 IST

एकनाथ शिंदेंच्या या विधानावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी साहित्य अकादमीने दिलेल्या अहवालावर निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारला आंतरमंत्री गट स्थापन करावयाचा होता; परंतु गेल्या एक वर्षापासून केंद्र सरकारने या गटाची स्थापनाच केलेली नाही. यामुळे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव केंद्र  सरकारच्या लालफितीत अडकलेला आहे. याचदरम्यान मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात राज्याचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनाच्या भाषणात दिली. 

एकनाथ शिंदेंच्या या विधानावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. केंद्र सरकारने स्वाभिमानी मराठी सरकार पाडून त्यांचे मराठीवर किती प्रेम आहे, हे दाखवून दिले. या सरकारने त्यांच्या महाशक्तीला सांगावे की अभिजात भाषेचा दर्जा द्या. त्यांचे सरकार असूनही होत नाही, अशी टीका संजय राऊतांनी केली. तसेच आज शिवसेनेच्या विधीमंडळ कार्यलयातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फोटो हटवण्यात आले. यावर देखील संजय राऊतांनी भाष्य केलं. 

तुम्ही आयुष्यभर ज्यांचं मीठ खाल्लं, ज्यांनी तुम्हाला आयुष्यात मान-सन्मान आणि प्रतिष्ठा प्राप्त करून दिला. अगदी बाळासाहेब ठाकरेंपासून उद्धव ठाकरेंपर्यंत ज्यांनी तुम्हाला विविध पदावर नेमलं, म्हणून तुम्ही आज गद्दारीची क्रांती करू शकलात. तुम्ही त्यांचे फोटो काढता, याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. तसेच शिंदे गटाचं संबंधित कृत्य हा शूद्रपणा आहे, तो हलकटपणा आहे, असा निशाणाही संजय राऊतांनी साधला. संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

एकनाथ शिंदेंची ग्वाही-

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु झालं. आज मराठी भाषा गौरव दिन देखील असल्याने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भातचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सभागृहात उपस्थित केला. यावर सभागृहातील सर्व सदस्यांच्या भावना लक्षात घेवून लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यातील शिष्टमंडळासह पंतप्रधानांची भेट घेईल आणि त्यांना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत कार्यवाही लवकरात लवकर करावी, अशी विनंती करण्यात येईल, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNashikनाशिकEknath Shindeएकनाथ शिंदे