शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासंदर्भात २७ मे रोजी भूमिका स्पष्ट करणार : खासदार संभाजी राजे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 18:16 IST

मराठा आरक्षणासंदर्भात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करीत समाजाच्या तज्ज्ञ लोकांशी संवाद साधणार आहे. त्यासाठीच नाशिकसह सोलापूर, कोल्हापूर, नांदेडसह महाराष्ट्रातील समाज प्रतिनिधींच्या भावना जाणून घेतल्यानंतर २७ मे रोजी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार असून त्यानंतर त्याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन समाजाची भूमिका स्पष्ट केली जाणार असल्याचे राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी सांगितले.

ठळक मुद्देमराठा आरक्षणासंदर्भात तज्ज्ञांशी संवाद साधणार, राज्यभर दौरा करून जाणून घेणार प्रतिक्रिया, 27 मे रोजी भूमिका स्पष्ट करणार - खासदार संभाजी राजे

नाशिक: मराठा आरक्षणासंदर्भात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करीत समाजाच्या तज्ज्ञ लोकांशी संवाद साधणार आहे. त्यासाठीच नाशिकसह सोलापूर, कोल्हापूर, नांदेडसह महाराष्ट्रातील समाज प्रतिनिधींच्या भावना जाणून घेतल्यानंतर २७ मे रोजी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार असून त्यानंतर त्याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन समाजाची भूमिका स्पष्ट केली जाणार असल्याचे राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी सांगितले.कोरोना संकटात कुटुंबीयांना गमावलेल्या कार्यकर्त्यांचे सांत्वन करण्यासोबतच मराठा समाजातील प्रतिनिधींसोबत चर्चा करून आरक्षणाविषयी मत जाणून घेण्यासाठी छत्रपती संभाजी राजे दोन दिवसांपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांनी गुरुवारी (दि. २०) शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत मराठा आरक्षणाविषयी भूमिका स्पष्ट केली. मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर राज्य आणि केंद्रात सत्तेत असलेल्या पक्षांतील नेत्यांकडून एकमेकांवर जबाबदारी झटकली जात असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.कोरोनाच्या संकटात राज्यासाठी पुढील सहा-सात दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आपण संयमाची भूमिका घेतली असून माणसं जगली, तर आरक्षणासाठी लढा देता येईल, असे मत व्यक्त करतानाच यासंदर्भात राज्याच्या विविध भागांतील समाजाच्या प्रतिनिधींशी संवाद साधून २७ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी दिली आहे.

आक्रमक होण्याची ही वेळ नाहीमाझ्या संयमाच्या भूमिकेविषयीही काही जणांकडून साशंकता व्यक्त केली जात आहे. परंतु, सध्या आक्रमक होण्याची वेळ नाही, माणसं जगली तर आरक्षासाठी लढा देता येईल, असे मत छत्रपती संभाजी राजे यांनी व्यक्त केले. सत्ताधारी व विरोधातील नेते एक-दुसऱ्याविरोधात आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. त्याच्याशी मराठा समाजाला काहीच घेणेदेणे नाही. आरक्षणाविषयी मार्ग काय काढणार आहात ते समाजाला सांगा, असे आ‌वाहनही त्यांनी सरकारी व विरोधी पक्षातील नेत्यांना केले. दरम्यान, पंतप्रधानांना चारदा पत्र लिहूनही त्यांची वेळ मिळाली नसल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली असून, १०२ व्या घटनादुरुस्तीविषयीही २७ मे रोजी पत्रकार परिषदेत बोलणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणNashikनाशिकSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती