खासदार गोडसे यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी
By Admin | Updated: June 1, 2014 00:49 IST2014-05-31T21:43:03+5:302014-06-01T00:49:29+5:30
हरसूल : परिसरात नुकताच झालेल्या अवकाळी पावसाने जातेगाव, वायघोळ, बेलपाली या गावात अनेक घरांचे नुकसान झालेले असताना सत्ताधारी नेते हरसूलमध्ये उद्घाटनामध्ये व्यस्त असल्याचा आरोप नवनिर्वाचित खासदार हेमंत गोडसे यांनी जातेगाव येथे नुकसानग्रस्त घरांची पाहणी करताना आरोप केले.

खासदार गोडसे यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी
हरसूल : परिसरात नुकताच झालेल्या अवकाळी पावसाने जातेगाव, वायघोळ, बेलपाली या गावात अनेक घरांचे नुकसान झालेले असताना सत्ताधारी नेते हरसूलमध्ये उद्घाटनामध्ये व्यस्त असल्याचा आरोप नवनिर्वाचित खासदार हेमंत गोडसे यांनी जातेगाव येथे नुकसानग्रस्त घरांची पाहणी करताना आरोप केले.
यावेळी नुकसानग्रस्तांना तातडीची मदत त्वरित द्यावी व आदिवासी भागासाठी नुकसानग्रस्तांसाठी बनवलेल्या नियमावली शिथिल करावी, अशी सूचना त्यांनी त्र्यंबकेश्वर तहसीलदार नरेंद्र बहिरम यांना करत जातेगाव येथे मंडळ अधिकारी, तलाठी यांनी तातडीने नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे केले, तर परिसरात अनेक विजेचे खांब कोसळले ते त्वरित उभे करून हरसूल परिसरात वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना गोडसे यांनी विद्युत कंपनीच्या अधिकार्यांना दिल्या. यावेळी शिवराम झोले, अशोक गुंबाडे, विलास आडके, समाधान बोडके, मिथुन राऊत, भरत खोटरे, आशलाख शेख, उपसरपंच नितीन लाखन, शहरप्रमुख विठ्ठल भोये, नितीन शेंडे, दत्तात्रय व्यवहारे, आरिफ सय्यद, प्रभाकर महाले, रमेश शेंडे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)