स्थायीवर जाण्यासाठी सदस्यांमध्ये हालचाली सुरू
By Admin | Updated: February 21, 2015 01:53 IST2015-02-21T01:51:05+5:302015-02-21T01:53:28+5:30
स्थायीवर जाण्यासाठी सदस्यांमध्ये हालचाली सुरू

स्थायीवर जाण्यासाठी सदस्यांमध्ये हालचाली सुरू
नाशिक : महापालिका स्थायी समितीचे आठ सदस्य येत्या २८ फेब्रुवारीला निवृत्त होणार असून, त्यांच्या रिक्त होणाऱ्या जागांवर नव्याने सदस्य निवडीसाठी शुक्रवारी (दि.२७) सकाळी ११.३० वाजता विशेष सभा बोलाविण्यात आली आहे. त्यामुळे स्थायीवर जाण्यासाठी सदस्यांमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. महापालिकेतील स्थायी समितीचे सभापती राहुल ढिकले यांच्यासह मनसेच्या शीतल भामरे, अर्चना थोरात, दीपाली कुलकर्णी, कॉँग्रेसचे शिवाजी गांगुर्डे, राष्ट्रवादीचे शोभा आवारे, राजेंद्र महाले व रूपाली गावंड हे आठ सदस्य येत्या २८ फेबु्रवारीला निवृत्त होणार आहेत. भाजपा आणि अपक्ष गट यांच्याकडून विद्यमान सदस्यांचे राजीनामे घेऊन नव्या लोकांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. सेनेकडूनही नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते.
आता स्थायी समितीतील रिक्त आठ जागांसाठी विशेष सभा येत्या शुक्रवारी होणार असून, त्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय इच्छुक सदस्यांमध्ये हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, सर्वपक्षीय गटनेत्यांकडून स्थायीवर जाणाऱ्या सदस्यांची यादी लवकरच सादर होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)