चिचोंडी ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 16:11 IST2018-11-10T16:11:16+5:302018-11-10T16:11:32+5:30

जळगाव नेऊर : येवला तालुका दुष्काळी जाहीर झाला मात्र यामध्ये तालुक्यातील सतरा गावांवर अन्याय झाला असून शहरातील पाऊस मोजमाप ...

The movement of the villagers of Chichondhi | चिचोंडी ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन

चिचोंडी ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन

जळगाव नेऊर : येवला तालुका दुष्काळी जाहीर झाला मात्र यामध्ये तालुक्यातील सतरा गावांवर अन्याय झाला असून शहरातील पाऊस मोजमाप या सतरा गावांना लावून सरकारने दुष्काळ यादीतून चिचोंडीसह परिसरातील सतरा गावांना वगळले. याविरु द्ध चिचोंडी येथील शेतकऱ्यांनी दंडावर काळ्या फिती बांधून व काळे झेंडे दाखवत सरकारचा जाहीर निषेध करत रस्त्यावर ठाण मांडत सरकारच्या विरोधी घोषणा दिल्या. येवल्यावर पडणारा पाऊस फक्त येवला शहरातच पडतो गावाच्या दोन किलोमीटर अंतरावर अनेकदा पाऊस पडत नसतांना दिसून येतो. त्यामुळे मंडळनिहाय जाहीर झालेला दुष्काळ खेड्यावर अन्याय करणारा असून आमच्या गावाचा दुष्काळ गावांच्या यादीत समावेश करावा या मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी संतोष मढवई, साईनाथ मढवई, प्रमोद देवडे, बाबासाहेब शिंदे, सुरेश मढवई, दीपक पाटील, प्रमोद पाटील, दिलीप मढवई, बशीर शहा, राजेंद्र घोटेकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शेकडो शेतकरी उपस्थित होते. स्वाभिमानी सेनेचे जिल्हाध्यक्ष शेरु भाई मोमीन यांनी यास पाठींबा दिला.

Web Title: The movement of the villagers of Chichondhi

टॅग्स :Nashikनाशिक