सटाणा, मालेगावी धनगर समाजाचे आरक्षणासाठी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 16:28 IST2018-08-13T16:28:09+5:302018-08-13T16:28:19+5:30
सटाणा/मालेगाव : सकल धनगर समाजाला शासनाने तातडीने आरक्षण जाहीर करावे या मागणीसाठी सटाणा व मालेगाव तालुक्यातील धनगर समाजाने येथील तहसील कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन केले. यावेळी तहसीलदार ज्योती देवरे यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

सटाणा, मालेगावी धनगर समाजाचे आरक्षणासाठी आंदोलन
सटाणा/मालेगाव : सकल धनगर समाजाला शासनाने तातडीने आरक्षण जाहीर करावे या मागणीसाठी सटाणा व मालेगाव तालुक्यातील धनगर समाजाने येथील तहसील कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन केले. यावेळी तहसीलदार ज्योती देवरे यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. धनगर समाजाला आरक्षण द्यावे यासाठी तालुक्यातील धनगर समाज आक्रमक झाला आहे. आरक्षण नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शासनाच्या योजनांचा लाभ मिळत नाही. समाजावर अन्याय केला जात आहे. शासन धनगर व धनगड अशा शब्दांचा खेळ करून समाजाची दिशाभूल करीत आहेत. समाजाला तातडीने आरक्षण द्यावे या मागणीसाठी येथील तहसील कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनाला कॉँग्रेसचे नेते प्रसाद हिरे, बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनील देवरे, समता परिषदेचे धर्मा भामरे आदींनी पाठिंबा दिला. आंदोलनात कृउबाचे संचालक राजाभाऊ खेमनार, बंडू कुवर, आर.पी. कुवर, दत्तू वडक्ते, निंबा जाधव, अशोक कन्नोर, चंदू बिचकुले, प्रकाश बोरकर आदींसह समाजबांधव सहभागी झाले होते.