मालेगावी यंत्रमाग कारखानदारांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 14:15 IST2018-11-26T14:15:16+5:302018-11-26T14:15:28+5:30
मालेगाव : यंत्रमाग कारखान्यांना सवलतीच्या दरात वीजपुरवठा करावा, वस्त्रोद्योग धोरणाची अंमलबजावणी करावी, कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्यात यावे, सूतसाठेबाजी व काळाबाजार रोखावा यासह अन्य मागण्यांप्रश्नी सोमवारी येथील यंत्रमागधारक समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अपर जिल्हाधिकाºयांच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन छेडले होते.

मालेगावी यंत्रमाग कारखानदारांचे धरणे आंदोलन
मालेगाव : यंत्रमाग कारखान्यांना सवलतीच्या दरात वीजपुरवठा करावा, वस्त्रोद्योग धोरणाची अंमलबजावणी करावी, कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्यात यावे, सूतसाठेबाजी व काळाबाजार रोखावा यासह अन्य मागण्यांप्रश्नी सोमवारी येथील यंत्रमागधारक समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अपर जिल्हाधिकाºयांच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन छेडले होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. शहरातील यंत्रमागावर मंदीचे सावट आहे. सूताला उठाव नसल्याने यंत्रमाग व्यवसाय कोलमडून पडत आहे. शासनाने यंत्रमाग कारखान्यांना सवलतीच्या दरात वीजपुरवठा करावा, बेकायदेशीर आयात पूर्णपणे बंद करावी, सूताचे दर स्थिर ठेवावेत, सूताची साठेबाजी व काळाबाजार रोखावा, यंत्रमाग उद्योगासाठी स्वतंत्र यंत्रमाग विभाग सुरू करावा, वीजदरातील तफावत दूर करावी, वीज दरात सवलत उपलब्ध करुन द्यावी, यंत्रमाग धारकांना कर्ज वाटप करीत असताना व्याजात सवलत द्यावी, वस्त्रोद्योग धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, यंत्रमाग उद्योगासाठी स्थिर धोरण ठेवावे, कामगार कल्याण मंडळाची स्थापना करण्यात यावी यासह विविध मागण्यांप्रश्नी येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर यंत्रमाग कारखानदारांनी धरणे आंदोलन छेडले होते. शासनाच्या चुकीच्या यंत्रमागधोरणाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली.आंदोलनात यंत्रमाग समन्वय समितीचे युसुफ इलियास, मौलाना जाहीद नदवी, अब्दुल अजीज मुकादम, फिरोज आझमी, हाफीज साजीद, अल्ताफ किराणावाला, अब्दुल मलीक बकरा, खलील मोटो, उमरजान, मोहंमद इराफत आदिंसह यंत्रमाग कारखानदार सहभागी झाले होते.