पुंडलिकनगरमधील मुख्य रस्त्याची दुरुस्ती न केल्यास आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:18 IST2021-07-07T04:18:02+5:302021-07-07T04:18:02+5:30

सटाणा : शहरातील पुंडलिकनगर नववसाहतीला जोडणारा रस्ता येत्या पंधरा दिवसात पालिका प्रशासनाने दुरुस्त न केल्यास पालिका कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन ...

Movement if main road in Pundaliknagar is not repaired | पुंडलिकनगरमधील मुख्य रस्त्याची दुरुस्ती न केल्यास आंदोलन

पुंडलिकनगरमधील मुख्य रस्त्याची दुरुस्ती न केल्यास आंदोलन

सटाणा : शहरातील पुंडलिकनगर नववसाहतीला जोडणारा रस्ता येत्या पंधरा दिवसात पालिका प्रशासनाने दुरुस्त न केल्यास पालिका कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा रहिवाशांनी मुख्याधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

सटाणा-मालेगाव रस्त्यावरील पुंडलिकनगर वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने सर्वत्र चिखलयुक्त रस्ता झाल्याने रहिवाशांची या ठिकाणाहून मार्ग काढतांना गैरसोय होते. अनेक वेळा पालिका प्रशासनाला निवेदन देऊनही रस्ता दुरुस्ती होत नाही.

पुंडलिकनगरमधील रहिवासी दरवर्षी पालिकेचा मालमत्ता व इतर कर वेळेवर भरत असतानादेखील पुंडलिक नगर पालिकेच्या सुविधांपासून वंचित आहे. येत्या १५ दिवसात पुंडलिकनगरमध्ये जाणारा रस्ता दुरुस्त न झाल्यास नागरिक यापुढे पालिकेचा कोणताही कर भरणार नाहीत तसेच पालिका कार्यालयात ठिय्या आंदोलन करतील, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

यावेळी मनसेचे शहराध्यक्ष पंकज सोनवणे, किरण सोनवणे, पोपट चव्हाण, कैलास निकम, रामदास सोनवणे, यशवंत अहिरे, प्रवीण बागड, मयूर कोतकर, दीपक पगार, गुलाब जैन, भूषण पाटील, संदीप साळुखे, विनायक पवार, दादाजी सोनवणे यांच्यासह रहिवाशांनी दिला आहे.

फोटो - ०६ सटाणा रस्ता

सटाणा येथील पुंडलिकनगरमधील रस्त्याप्रकरणी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देताना पंकज सोनवणे, किरण सोनवणे, पोपट चव्हाण, रामदास सोनवणे, मयूर कोतकर आदी.

060721\06nsk_16_06072021_13.jpg

सटाणा येथील पुंडलीकनगरमधील रस्त्याप्रकरणी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देताना पंकज सोनवणे, किरण सोनवणे, पोपट चव्हाण, रामदास सोनवणे, मयूर कोतकर आदी.

Web Title: Movement if main road in Pundaliknagar is not repaired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.