शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये मैत्रेय सुवर्णसिद्धी विरोधात गुंतवणूकदारांचे पोलीस ठाण्यासमोर आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 16:30 IST

शहरासह तालुक्यातील गोरगरीब शेतमजूर, घरकाम करणाऱ्या शेकडो महिला व पुरुषांनी गेल्या तीन ते चार वर्षांपूर्वी मैत्रेय सुवर्णसिद्धी प्रा.लि.कंपनीच्या शहरातील शाखेत सोन्याच्या नाण्याचे अमिष दाखवून लाखो रुपयांच्या ठेवी जमा केल्या होत्या.मात्र अचानक 3 फेब्रुवारी 2016 रोजी रात्रीतून गाशा गुंडाळून शाखा बंद केली.

सटाणा (नाशिक) : मैत्रेय सुवर्णसिद्धी प्रा.लि.कंपनीच्या संचालकांनी गुंतवणुकीच्या नावावर कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्हा दाखल करून चार महिने उलटले तरी अद्याप कोणतीही कारवाई न केल्याने संतप्त झालेल्या चारशे ते पाचशे गुंतवणूक दारांनी आज दुपारी शहरातून मोर्चा काढून सटाणा पोलीस ठाण्यावर हल्लाबोल केला. यावेळी संतप्त महिलांनी पोलीस ठाण्यासमोर एक तास ठिय्या देऊन पोलीस प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी केली.शहरासह तालुक्यातील गोरगरीब शेतमजूर, घरकाम करणाऱ्या शेकडो महिला व पुरुषांनी गेल्या तीन ते चार वर्षांपूर्वी मैत्रेय सुवर्णसिद्धी प्रा.लि.कंपनीच्या शहरातील शाखेत सोन्याच्या नाण्याचे अमिष दाखवून लाखो रुपयांच्या ठेवी जमा केल्या होत्या.मात्र अचानक 3 फेब्रुवारी 2016 रोजी रात्रीतून गाशा गुंडाळून शाखा बंद केली.त्यानंतर ठेवी धारकांनी कंपनीच्या वरिष्ठांकडे चौकशी केली असता व्याजासह पैसे मिळणार असल्याचे सांगण्यात मात्र वर्ष दीड वर्ष उलटूनही पैसे न मिळाल्याने शेकडो ठेवी धारकांनी सटाणा पोलीस ठाण्यात गेल्या 6 जुलैला कंपनीचे संचालक लक्ष्मीकांत श्रीकृष्ण नार्वेकर ,विजय शंकर तावरे दोघे राहणार विरार ,मुंबई यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.त्यानंतर साडे तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या गुन्हा आर्थिक गुन्हे शाखा नाशिक यांच्याकडे वर्ग करण्यात आला.मात्र मात्र चार महिने उलटूनही संबंधितांवर कोणतीही कारवाई न केल्याने संतप्त चारशे ते पाचशे ठेवीदार महिला व पुरुषांनी आज दुपारी 1 वाजता शहरातील शिवाजी महाराज पुतळ्यापासून मोर्चा काढला.ताहाराबाद रोड या प्रमुख मार्गाने हा मोर्चा पोलीस ठाण्यावर नेण्यात आला.यावेळी संतप्त महिलांनी हल्लाबोल करून पोलीस प्रशासना विरुद्ध घोषणाबाजी केली.यावेळी पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांनी मोर्चेकर्यांना सामोरे जात मैत्रेय कंपनीने फसवणूक केल्या प्रकरणी नाशिक आर्थिक गुन्हे शाखेचा तपास योग्य पद्धतीने सुरु असून लवकरच ठेवीदारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल.असे आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिकagitationआंदोलन