जिल्हाधिकारी कार्यालसमोर सिलिंडरसह आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 01:13 AM2020-02-14T01:13:33+5:302020-02-14T01:14:41+5:30

घरगुती सिलिंडरच्या दरात १४५ रुपयांची वाढ करण्यात आल्यामुळे नागरिकांना जवळपास सुमारे ८५० रुपयांपर्यंत सिलिंडर घ्यावे लागत आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, सदर दरवाढ रद्द करावी या मागणीसाठी राष्टÑवादी महिला कॉँग्रेसकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सिलिंडर ठेवून निदर्शने केली. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

Movement with cylinder in front of the collector's office | जिल्हाधिकारी कार्यालसमोर सिलिंडरसह आंदोलन

जिल्हाधिकारी कार्यालसमोर सिलिंडरसह आंदोलन

Next

नाशिक : घरगुती सिलिंडरच्या दरात १४५ रुपयांची वाढ करण्यात आल्यामुळे नागरिकांना जवळपास सुमारे ८५० रुपयांपर्यंत सिलिंडर घ्यावे लागत आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, सदर दरवाढ रद्द करावी या मागणीसाठी राष्टÑवादी महिला कॉँग्रेसकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सिलिंडर ठेवून निदर्शने केली. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
केंद्र सरकारने सिलिंडरच्या दरात अचानक वाढ केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले असून, वाढत्या महामाईत सिलिंडरची दरवाढ केल्याने महिलावर्गात प्रचंड संताप आहे. सदर दरवाढ मागे घ्यावी, अशा मागणीचे निवेदन शहराध्यक्ष अनिता भामरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी दिले आहे. या निर्णयाचा विरोध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमलेल्या महिला कार्यकर्त्यांनी झुठा वादा; महंगाई ज्यादा, बहोत हुई महंगाई की मार, अभी बस करो मोदी सरकार अशा घोषणा दिल्या.
प्रत्येक घरामध्ये सिलिंडरची आवश्यकता असून जीवनाश्यक असलेल्या वस्तूंमध्ये
इतक्या मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली
वाढ अन्यायकारक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Movement with cylinder in front of the collector's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.