कोचिंग क्लासेस संचालकांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:10 IST2021-06-23T04:10:58+5:302021-06-23T04:10:58+5:30
नाशिक : कोरोनाच्या संकटात गेल्या पंधरा महिन्यांपासून शहर व जिल्ह्यातील सर्व कोचिंग क्लासेस बंद असल्याने संचालक, शिक्षक, कर्मचारी यांच्यासमोर ...

कोचिंग क्लासेस संचालकांचे आंदोलन
नाशिक : कोरोनाच्या संकटात गेल्या पंधरा महिन्यांपासून शहर व जिल्ह्यातील सर्व कोचिंग क्लासेस बंद असल्याने संचालक, शिक्षक, कर्मचारी यांच्यासमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. क्लासेसला अद्याप परवानगी मिळालेली नसल्याने क्लासेस संचालकांची कुचंबणा होत असून, क्लासेस चालविण्यासाठी क्लास चालकांना परवानगी मिळावी यासाठी नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संघटनेने हुतात्मा स्मारक परिसरात मंगळवारी (दि. २२) आंदोलन केले. दरम्यान, पोलिसांनी ठिय्या आंदोलनाला परवानगी नाकारल्याने संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना क्लासेस सुरू करण्याच्या परवानगीसाठी निवेदन दिले.
नाशिक शहर व जिल्ह्यातील कोचिंग क्लासेस सुरू करण्याची परवानगी मिळावी यासाठी मंगळवारी नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संघटनेतर्फे ठिय्या आंदोनल करण्यात येणार होते. परंतु, पोलीस प्रशासनाने आंदोलनाला परवानगी नाकारली होती. मात्र, संघटनेचे पदाधिकारी आणि सभासद नियोजित वेळेत आंदोलनस्थळी जमल्याने पोलिसांनी त्यांना ठिय्या आंदोलन करण्यास मज्जाव केला. त्यामुळे आंदोलकांनी एकत्र येऊन शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्णय घेतला. यावेळेत पोलिसांनी आंदोलकांना पांगविल्यामुळे आंदोलकांनी पुन्हा सीबीएस परिसरात एकत्र येऊन कोचिंग क्लासेस सुरू करण्याच्या मागणीसाठी घोषणाबाजी केली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे, प्रकाश डोशी, उपाध्यक्ष अरुण कुशारे, विवेक भोर, अशोक देशपांडे, मुकुंद रनाळकर, कैलास देसले, लोकेश पारख, रवींद्र पाटील, सचिन जाधव, पराग घारपुरे, सचिन अपसुंदे, विष्णू चव्हाण, प्रमोद गुप्ता, सचिन शिंदे, किशोर डोंगरे, राहुल चौधरी, संतोष पवार, अमिर शेख, दिनेश राठोड, प्रमोद गुप्ता, धनंजय ढाकणे, दत्ता नेरकर, सागर सानप, महेश भोरे यांच्यासह अनेक क्लासेस संचालक आंदोलनात सहभागी झाले होते.
===Photopath===
220621\22nsk_18_22062021_13.jpg
===Caption===
नाशिक जिल्हा कोचिंग क्लास संघटनेतर्फे हुतात्मा स्मारक येथे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष जयंतमुळे यांच्यासह प्रकाश डोशी, उपाध्यक्ष अरुण कुशारे, विवेक भोर, अशोक देशपांडे, मुकुंद रनाळकर, कैलास देसले, लोकेश पारख, रविंद्र पाटील, सचिन जाधव आदी