नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅँकेत सोसायटी अध्यक्षांचे आंदोलन
By Admin | Updated: April 25, 2017 13:22 IST2017-04-25T13:22:54+5:302017-04-25T13:22:54+5:30
आंदोलकांनी जिल्हा बॅँकेला ठोकले टाळ

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅँकेत सोसायटी अध्यक्षांचे आंदोलन
नाशिक- नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेतुन पैसे मिळत नसल्याने विविध कार्यकारी सोसायटी संचालकांनी जिल्हा बॅँकेसमोर आज निदर्शने केली. तसेच बॅँकेच्या मुख्य कार्यालयाला टाळे ठोकले. जिल्हा मध्यवर्ती बॅँक आर्थिक अडचणीत असल्याने शेतकऱ्यांना पिक कर्ज देणे बंद करण्यात आले आहे. तसेच शासकीय अनुदानित शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात येत नसल्याने गेल्या दोन दिवसांपासून शिक्षकही आंदोलन करीत आहेत. आंदोलनात १०७५ सोसायटयांचे चेअरमन सहभागी झाले होते. १५ दिवसांपुर्वीही त्यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांना पिककर्ज देण्याविषयी आश्वासन दिले होते मात्र अद्यापही त्याबद्दल काहीही कार्यवाही झालेली नसल्याने सोसायट्या व शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.