मालेगावी अवजड वाहनांविरोधात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 00:30 IST2018-05-18T00:30:15+5:302018-05-18T00:30:15+5:30
मालेगाव : शहरातील शिव रस्त्याने अवैधरीत्या वाळूचा उपसा करून अवजड वाहने जात असल्याने रस्त्याची दुर्दशा झाली असून, संतप्त नागरिकांनी गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास आंदोलन केले. यावेळी तहसीलदार ज्योती देवरे यांनी मध्यस्थी केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

मालेगावी अवजड वाहनांविरोधात आंदोलन
मालेगाव : शहरातील शिव रस्त्याने अवैधरीत्या वाळूचा उपसा करून अवजड वाहने जात असल्याने रस्त्याची दुर्दशा झाली असून, संतप्त नागरिकांनी गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास आंदोलन केले. यावेळी तहसीलदार ज्योती देवरे यांनी मध्यस्थी केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. अवजड वाहने कलेक्टरपट्ट्यातील शिवरोडने जात असल्याने रस्ता खराब झाला असून, संबंधितांनी रस्ता दुरुस्त करून द्यावा अशी मागणी केली. आंदोलकांनी एम.एच.१८ बी. जे. ९११७ क्रमांकाचा वाळूचा डंपर अडवून ठेवला होता. पोलीस निरीक्षक विश्वकर्मा यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तहसीलदार ज्योती देवरे यांनी घटनास्थळी भेट देऊन अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात नगरसेवक मदन गायकवाड, राजू शेलार, राकेश भामरे, सचिन भडांगे, रामा हिरे, मोगली पाटील, युवराज गोलाईत यांनी सहभाग घेतला.