इगतपुरीचे दुय्यम निबंधक कार्यालय नवीन इमारतीत हलवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 16:25 IST2020-06-19T16:24:35+5:302020-06-19T16:25:19+5:30

शिवशाही तालुका बचाव समितीचे निवेदन

Move the secondary registrar's office to a new building | इगतपुरीचे दुय्यम निबंधक कार्यालय नवीन इमारतीत हलवा

इगतपुरीचे दुय्यम निबंधक कार्यालय नवीन इमारतीत हलवा

ठळक मुद्देदुय्यम निबंधक कार्यालयाचे नियोजित कार्यालय बोरटेंभे येथील नवीन तहसील कार्यालया शेजारी बांधून पुर्ण

इगतपुरी : शहरात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असून एकाच आठवड्यात शहरात कोरोना रु ग्णांची संख्या १६ झाली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील दुय्यम निबंधक कार्यालय नवीन इमारतीत हलविण्यात यावे, या मागणीचे निवेदन शिवशाही तालुका बचाव समितीने तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रवाभ वाढत चालला आहे. दस्त नोंदणी करीता तालुक्यातील जनतेला अजुनही जुन्याच ठिकाणी असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयात जावे लागत आहे. वास्तविक दुय्यम निबंधक कार्यालयाचे नियोजित कार्यालय बोरटेंभे येथील नवीन तहसील कार्यालया शेजारी बांधून पुर्ण झाले आहे. जुने कार्यालय इगतपुरी पोलीस ठाणे शेजारी असल्याने येथे येणाऱ्या नागरीकांचीही धावपळ होत आहे. कोरोनाचा वाढता धोका पाहुन प्रशासनाने वेळीच दुय्यम निबंधक कार्यालय नवीन बांधलेल्या इमारतीत त्वरीत स्थलांतरीत करण्यात यावे अशी मागणी शिवशाही तालुका बचाव समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. रोहीत उगले, राजु पढेर, पद्माकर कडू यांनी केली आहे.
 

Web Title: Move the secondary registrar's office to a new building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक