देवळ्यात जोडे मारो आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 18:19 IST2018-09-09T18:19:18+5:302018-09-09T18:19:45+5:30
भाजपचे आमदार राम कदम यांनी युवतींविषयी काढलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आज देवळा येथील पाच कंदील चौकात आमदार राम कदम यांच्या प्रतिमेला चप्पल मारो आंदोलन करीत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

देवळ्यात जोडे मारो आंदोलन
देवळा : भाजपचे आमदार राम कदम यांनी युवतींविषयी काढलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने येथील पाच कंदील चौकात आमदार राम कदम यांच्या प्रतिमेला चप्पल मारो आंदोलन करीत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. यावेळी आमदार राम कदम यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, तसेच त्यांची आमदारकी रद्द करून कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी रोशनी निकम, रूपाली शिरसाठ, गायत्री खैरनार, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सुलभा अहेर, यांनी राम कदम यांच्या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.