The mountaineers of Nashik made Brahma Khuta Sulka Sir | नाशिकच्या गिर्यारोहकांनी केला ब्रम्हा खुटा सुळका सर

नाशिकच्या गिर्यारोहकांनी केला ब्रम्हा खुटा सुळका सर

ठळक मुद्देप्रथमच यशउंची तब्बल १७० फुट

नाशिक- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नाशिकमधील वैनतेय गिर्यारोहण गिरीभ्रमण संस्थेच्या गिर्यारोहकांनी त्रिंबकरांगेतील हरिहर किल्ल्यानजीक ब्रह्मा खुटा हा अस्पर्शित सुळका प्रथमतःच आरोहण करण्यात यश मिळवले आहे.

नाशिक जिल्ह्यातील सह्याद्रीच्या त्र्यंबकेश्वर रांगेत हरिहर आणि त्र्यंबकगड यांमध्ये ब्रह्मा पर्वत आहे. ब्रह्माच्या पूर्व भागातील मधल्या टप्प्यावर खुटा नामक सुळका आहे. सुळक्याची विविध मार्गांची उंची ८५ ते १७० फूट असून गिर्यारोहणाच्या श्रेणीनुसार या सुळक्याचे आरोहण मध्यम ते कठीण प्रकारात मोडते. विशेष म्हणजे ह्या सुळक्याची गिर्यारोहणाच्या यादीमध्येही नोंद नाही. आजपर्यंत हा सुळका गिर्यारोहकांकडून आणि स्थानिकांकडून आरोहित झालेला नव्हता. अस्पर्शित ब्रह्मा खुटा सुळका वैनतेय संस्थेच्या गिर्यारोहकांनी दोर लावून यशस्वीरित्या सर करत त्यावर पहिले पाऊल ठेवले. ही नाशिककरांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

वैनतेय संस्थेचे गौरव जाधव (प्रथम आरोहक), सागर पाडेकर, रोहित हिवाळे यांच्यासह अपूर्व गायकवाड, निनाद देसले, तेजस देसाई, अमित भामरे, विद्या आहिरे या गिर्यारोहकांनी ही मोहिम यशस्वी केली. वैनतेयचे विश्वस्त सुदर्शन कुलथे, भाऊसाहेब कानमहाले, आशिष शिंपी, मनोज बैरागी यांच्यासह नाशिक मधील पहिल्या महिला आरोहक सुषमा मिशाळ-मराठे यांचे या मोहिमेला मार्गदर्शन लाभले.
 

Web Title: The mountaineers of Nashik made Brahma Khuta Sulka Sir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.