शहरं
Join us  
Trending Stories
1
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
2
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
3
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
4
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
5
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
6
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
7
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
8
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
9
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
10
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
11
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
12
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
13
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
14
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
15
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
16
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
17
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
18
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
19
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
20
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री

विहिरीतून निघाल्या चोरीस गेलेल्या मोटारसायकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 12:51 AM

सिडको : पूर्वीच्या काळी घरातील सोने, पैसे अडके हे चोरांच्या भीतीपोटी घरातील एखाद्या कोपऱ्यात वा घराबाहेर जमिनीत पुरून ठेवले जात असत़ हीच पद्धत आता चोरट्यांनीही आत्मसात केली असून, त्यांनी जमिनीऐवजी विहिरीचा सहारा घेतल्याचे मंगळवारी अंबड येथील घटनेवरून समोर आले़

ठळक मुद्देचोरट्यांचे कृत्य तीन दुचाकी काढल्या विहिरीबाहेर; अनेक यंत्रांचे स्पेअर पार्टसही आढळले

सिडको : पूर्वीच्या काळी घरातील सोने, पैसे अडके हे चोरांच्या भीतीपोटी घरातील एखाद्या कोपऱ्यात वा घराबाहेर जमिनीत पुरून ठेवले जात असत़ हीच पद्धत आता चोरट्यांनीही आत्मसात केली असून, त्यांनी जमिनीऐवजी विहिरीचा सहारा घेतल्याचे मंगळवारी अंबड येथील घटनेवरून समोर आले़वाहन चोरी प्रकरणात अंबड पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित नवनाथ उर्फ डॉलर रामदास साळवे याने दोन साथीदारांसह शहरातून चोरी केलेल्या तीन दुचाकी व तसेच औद्योगिक वसाहतीतील कंपनीतून चोरलेले पार्ट या विहिरीत फेकून दिले होते़ पोलिसांनी त्याच्याकडून दहा दुचाकी व घरफोडीतील कंपनीचा मुद्देमाल, असा साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़अंबड औद्योगिक वसाहतीतील कंपनीमध्ये झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी दोन लाख रुपयांचे सुटे भाग चोरून नेल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती़ पोलिसांनी या चोरीप्रकरणी प्रमुख संशयितास अटक केल्यानंतर त्याचे साथीदार संशयित नवनाथ उर्फ डॉलर साळवे व अन्य दोघांनी पोलीस आपल्यापर्यंत पोहोचतील व आपल्याकडी चोरीच्या दुचाकी त्यांच्या हाती लागतील व आपला जेलची हवा खावी लागेल या भीतीपोटी अंबड खालचे चुंचाळे येथील पाणी असलेल्या एका विहिरीत तीन-चार दुचाकी फेकून दिल्या़ तसेच कंपनीतून चोरी केलेला मालही या विहिरीत टाकला़अंबड पोलिसांनी नवनाथ उर्फ डॉलर व त्याचे दोन साथीदारांच्या मुसक्या आवळल्यानंतर त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी दुचाकी विहिरीत टाकल्याची माहितीदिली़ त्यानुसार पोलिसांनीमंगळवारी दिवसभर दोन वेळा विहिरीतील पूर्ण पाणी मोटरच्या साहाय्याने उपसले व क्रेनने तीन दुचाकी विहिरीतून बाहेर काढल्या़या संशयितांकडून चोरीच्या एकूण दहा दुचाकी आढळून आल्या असून, त्या सातपूर, मुंबई नाका, इंदिरानगर, अंबड या ठिकाणाहून चोरण्यात आलेल्या आहेत़ दरम्यान, एक संशयितफरार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे़पोलीस उपनिरीक्षक तुषार चव्हाण, पोलीस हवालदार मल्ले, पोलीस नाईक दत्तात्रय गवारे, दुष्यंत जोपळे, विजय वरंदळ, अविनाश देवरे, हेमंत अहेर, दीपक वाणी, चंद्रकांत गवळी, धनंजय दोबाडे, विपूल गायकवाड मनोहर कोळी, प्रशांत नागरे यांनी ही कारवाई केली़दरम्यान, या विहिरीतील दोन वेळा पाणी उपसण्यात आले़ मात्र विहीर खोल व गाळ खूप खोल असल्याने यामध्ये माणूस उतरविणे जोखमीचे असल्याने क्रेनच्या साहाय्याने दुचाकी विहिरीबाहेर काढण्यात आल्या़दुचाकी चोरीतील पहिल्या संशयितास अटक केल्यानंतर दुसºया संशयितांचे अटकसत्र सुरू झाल्याने या संशयितांना चोरी गेलेल्या दुचाकी लपविण्यासाठी पुरेसा अवधी मिळाला नाही़ पोलीस आपल्यापर्यंत पोहोचले व आपल्याकडे मुद्देमाल सापडला की आपला जेलमधील आणखी वाढेल या भीतीपोटी त्यांनी आपल्याकडील दुचाकी विहिरीत टाकण्याचा सपाटा लावला़ तीन-चार दुचाकी टाकल्याही, मात्र दुसºया दिवशी या संशयितांना अटक केल्यानंतर हा प्रकार समोर आला़ यातून आणखी काही दुचाकी चोºया उघडकीस येतील़- सोमनाथ तांबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंबड पोलीस ठाणे़

टॅग्स :Crimeगुन्हाtheftचोरी