मोतीसिंग परदेशी यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 14:35 IST2020-10-09T14:35:40+5:302020-10-09T14:35:49+5:30
येवला : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक भारतीय जनता पार्र्टीचे माजी जिल्हाध्यक्ष मोतीसिंग भैय्यासिंग परदेशी (९०, रा. बुंदेलपुरा, येवला) यांचे गुरूवारी, (दि. ८) वृध्दापकाळाने निधन झाले.

मोतीसिंग परदेशी यांचे निधन
येवला : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक भारतीय जनता पार्र्टीचे माजी जिल्हाध्यक्ष मोतीसिंग भैय्यासिंग परदेशी (९०, रा. बुंदेलपुरा, येवला) यांचे गुरूवारी, (दि. ८) वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुले, एक विवाहित मुलगी, सुना-जावई, नातवंडे असा परिवार आहे. परदेशी येवला नगरपालिकेत नाका कारकून म्हणून भरती झाले होते. मात्र सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांनी नोकरी सोडून नगरपालिकेत नगरसेवकपदाची निवडणूक लढवून ते विजयी झाले. त्यानंतर येवला नगरपालिकेत त्यांनी नगरसेवकपदाबरोबरच नगराध्यक्षपदाचीही जबाबदारी सांभाळली. आपल्या कारकीर्दीत त्यांनी अनेक लोकहिताची कामे केली. शहराची आर्थिक सत्ता असलेल्या येवला मर्चंटस को-आॅप बँकेचे चेअरमनपद त्यांनी भूषविले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली बॅँकेत अनेक वर्ष सत्ता होती. तालुक्यासह जिल्ह्यात ते मोतीकाका परदेशी नावाने ओळखले जात होते. राष्टÑीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात तयार झालेल्या मोतीकाकांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली होती. त्याशिवाय जिल्हा मजूर फेडरेशनचे दीर्घकाळ संचालक आणि अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी पार पाडली. शहर व तालुक्याच्या राजकारणात त्यांचा दबदबा होता तर सवर्सामान्य कार्यकर्त्यांचे ते आधारस्तंभ होते. माजी नगरसेवक संजय परदेशी, शासकीय ठेकेदार दीपक परदेशी यांचे ते वडील होत.